Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताकडून यूएलपीजीएम-व्ही3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेचा नवा टप्पा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताकडून यूएलपीजीएम-व्ही3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेचा नवा टप्पा

admin
Last updated: 2025/07/25 at 6:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, २५ जुलै – भारताने स्वदेशी संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने आज आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील नॅशनल ओपन अ‍ॅक्सेस रेंज (NOAR) येथे ‘यूएव्ही-लाँच्ड प्रिसिजन गाइडेड मिसाईल’ (ULPGM) व्हर्जन 3 ची यशस्वी चाचणी केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, “ही चाचणी भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देणारी आहे. DRDO, संबंधित खाजगी उद्योग, MSMEs आणि स्टार्टअप्स यांचे यशाबद्दल अभिनंदन. ही चाचणी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

ULPGM-V3 क्षेपणास्त्राबाबत सविस्तर माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी यात अत्याधुनिक इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) सीकर आणि ड्युअल-थ्रस्ट प्रोपल्शन सिस्टम तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे मानले जात आहे. हे क्षेपणास्त्र हलके, अचूक मार्गदर्शनक्षम आणि विविध मानवरहित हवाई यंत्रणांशी (UAVs) सुसंगत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आधुनिक युद्धस्थितींमध्ये दूरस्थ, अचूक प्रहार करणे अधिक प्रभावी होणार आहे.

कुर्नूल येथील NOAR क्षेत्राची निवड ही DRDOच्या प्रगत चाचणी यंत्रणेचे प्रतीक मानली जाते. येथे अलीकडेच हाय एनर्जी लेसर शस्त्रे आणि ड्रोन न्यूट्रलायझेशन सिस्टम्स यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत.

ही यशस्वी चाचणी म्हणजे DRDO आणि खासगी उद्योग, MSMEs आणि स्टार्टअप्स यांच्यातील समन्वयाचे फळ असून भारताच्या ‘आत्मनिर्भर संरक्षण धोरणाचे’ एक ठोस उदाहरण मानले जात आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक सक्षम आणि स्वदेशी तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने ही मोठी झेप आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठीत न बोलण्याने भाषेला भोकं पडणार का?” – केतकी चितळेच्या वक्तव्यामुळे वादाचा नवा भडका
Next Article थायलंड-कंबोडिया संघर्षात हिंसाचार शिगेला; १६ मृत, यूएनची आपत्कालीन बैठक

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?