Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारत 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश

admin
Last updated: 2025/04/22 at 1:37 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून पुढे आली माहिती

नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : भारत सन 2060 पर्यंत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असेल अशी माहिती पुढे आली आहे. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटर संस्थेच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. सध्या मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, 2060 मध्ये जगात सर्वाधिक मुस्लीम भारतात असणार आहेत.

अहवालानुसार 2060 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येचा 19.4 टक्के हिस्सा मुस्लीम असेल, पाकिस्तानमध्ये 96.5 टक्के आणि बांगलादेशमध्ये 91.9 टक्के मुस्लीम असतील. भारताची 1947 साली फाळणी होऊन देश 2 भागांमध्ये विभागला गेला आणि पाकिस्तान एक स्वतंत्र देश बनला. फाळणीच्या वेळी लाखो हिंदू आणि मुस्लिमांना आपले घर, कुटुंब सोडून एका देशातून दुसऱ्या देशात जावे लागले. फाळणीनंतर पाकिस्तान मुस्लीम बहुल देश बनला आणि भारत हिंदू बहुल देश राहिला. त्यानंतर 24 वर्षांनी पाकिस्तानची फाळणी होऊन पूर्वेकडील भाग वेगळा झाला, ज्यातून बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या या फाळणीनंतर निर्माण झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मुस्लीम बहुसंख्य आहेत. तर भारतात मुस्लीम एक अल्पसंख्यांक समुदाय आहे. तरीही, जगात सर्वाधिक मुस्लीम भारतातच राहतात. पाकिस्तानमध्ये 96.4 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे, तर बांगलादेशमध्ये 90.6 टक्के मुस्लीम आहेत आणि भारतात एकूण लोकसंख्येपैकी फक्त 14.9 टक्के लोक मुस्लीम आहेत. मात्र, आकडेवारीनुसार पाहिले तर या तिन्ही देशांमध्ये सर्वाधिक मुस्लीम भारतातच राहतात.

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात 2060 सालासाठी अंदाज दिला आहे. या अंदाजात तिन्ही देशांच्या मुस्लीम लोकसंख्येचा वाढीचा दर आणि जन्मदर विचारात घेऊन 35 वर्षांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात किती मुस्लिम असतील, हे सांगितले आहे.या अहवालानुसार, 2060 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असेल. सध्या इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे.अहवालानुसार 2060 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येचा 19.4 टक्के हिस्सा मुस्लिम असेल, पाकिस्तानमध्ये 96.5 टक्के आणि बांगलादेशमध्ये 91.9 टक्के मुस्लिम असतील. प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, 2060 मध्ये इंडोनेशियामध्ये सुमारे 29 कोटी 90 लाख (299 मिलीयन) मुस्लीम असतील.

इंडोनेशिया सध्या जगातील सर्वात मोठा मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे, पण 2060 पर्यंत भारत त्या क्रमांकावर पोहोचेल, असा अंदाज आहे. भारतात मुस्लीम लोकसंख्या जास्त वेगाने वाढत असल्याने, भारत इंडोनेशियाला मागे टाकेल. भारतात 2060 मध्ये अंदाजे 33.3 कोटी मुस्लीम असतील. तर इंडोनेशियात 2060 पर्यंत अंदाजे 29.9 कोटी मुस्लीम लोकसंख्या असेल असे अहवालात म्हंटले आहे.————-

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारविरोधात न्यायलयात भरला खटला
Next Article डॉ. वळसंगकर आत्महत्येचा छडा लागणार का ? मृत्यूला गृहकलहाचा वास, पोलीस तपास वेगाने

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?