Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

admin
Last updated: 2025/05/29 at 5:51 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सियोल, 29 मे (हिं.स.)।आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून इतिहास रचला. या स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाने ४x४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय रिले संघाने जबरदस्त समन्वय आणि वेग दाखवत ३:१८.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी उत्तम कामगिरी केली. चारही धावपटूंनी उत्तम टीमवर्क दाखवले आणि सुरुवातीपासूनच भारताला शर्यतीत आघाडीवर ठेवले, ज्यामुळे निकाल भारताच्या बाजूने लागला. भारताने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. याआधीही भारताने या खेळात सुवर्णपदक जिंकले.

शर्यत संतोष कुमारने सुरू केली. त्याने जलद सुरुवात केली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने रुपल चौधरीकडे बॅटन सोपवले, त्याला चिनी खेळाडूने चांगलीच टक्कर दिली. पंरतु, रुपल वेग कायम ठेवला आणि विशाल टीकेकडे बॅटन दिला. विशालने सुरुवात धीमी केली. पण नंतर त्याने वेग वाढवून भारताला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या टप्प्यात धावणाऱ्या सुभा वेंकटेशनने जबरदस्त संतुलन आणि वेग दाखवला आणि सुवर्णपदक भारताच्या खिशात घातले.

भारतीय संघाने ही शर्यत ३:१८.१२ सेकंदात पूर्ण केली, ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या शर्यतीत चीन दुसऱ्या स्थानावर राहिला. चीनने ३:२०.५२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक जिंकले. श्रीलंका या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला. श्रीलंकेने ३:२१.९५ सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्य पदक जिंकले.या विजयासह भारताने ४×४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत आपले तिसरे पदक जिंकले.

२०१९ मध्ये प्रथमच भारताचा चॅम्पियनशिपमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी भारताने रौप्य पदक जिंकले. २०२३ मध्ये भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर आता भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.

You Might Also Like

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत केली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती
Next Article डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार पदावरून एलन मस्क यांची एक्झिट

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?