डब्लिन, ७ ऑगस्ट –
परदेशात भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात सहा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर अल्पवयीन मुलांनी हल्ला केला. “भारतात परत जा” अशी धमकी देत या मुलांनी तिच्यावर सायकलच्या चाकाने गुप्तांगावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घराबाहेर खेळत असताना घडली. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, हल्ला करणारे १२ ते १४ वयोगटातील होते. ती महिला आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे आणि अलीकडेच ती आयर्लंडची नागरिक झाली आहे.
घटनेनंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, तिने स्पष्ट केले की हल्लेखोरांना शिक्षा नको, तर त्यांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शन मिळावे अशी तिची इच्छा आहे.