Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय महिला शास्त्रज्ञाने विकसित केली कोरोना लस; ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये चाचणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

भारतीय महिला शास्त्रज्ञाने विकसित केली कोरोना लस; ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये चाचणी

Surajya Digital
Last updated: 2020/09/09 at 5:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लंडन : जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. जगभरात लस विकसित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काहींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापक सुमी विश्वास यांनी कोरोनाला अटकाव करणारी एक लस विकसित केली आहे. या लसीची चाचणी ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये होत आहे.

प्रा. सुमी विश्वास यांनी २०१७ मध्ये ब्रिटनमध्ये स्पाई बायोटेक नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या कार्यरत आहेत. सुमी विश्वास यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासोबत एकत्र काम केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या जेनर इन्स्टिट्यूटने एस्ट्राजेनकासोबत कोरोनावर लस विकसित केली आहे.

प्रा. सुमी विश्वास यांच्या स्पाई बायोटेकने विकसित केलेल्या लशीची मानवी चाचणी सुरू आहे. ऑस्ट्रेलियात या लशीची चाचणी सुरू आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही चाचणी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने संचलित केली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटसोबत सुमी विश्वास यांच्या स्पाय बायोटेक कंपनीने लस उत्पादनाबाबतचा करार केला आहे.

* प्रा. सुमी विश्वास यांच्याविषयी

प्रा. सुमी विश्वास यांचा जन्म कोलकातामधील लेक टाउन भागात झाला. बंगळुरू विद्यापीठातून त्यांनी मायक्रोबॉयोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. ऑक्सफर्डच्या जेनर इन्स्टिट्यूटसोबत मलेरियाविरोधातील लस विकसित करण्यासाठी काही वर्ष काम केले आहे.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

TAGGED: #भारतीय #महिलाशास्त्रज्ञ #कोरोनालस #विकसित #सुमीविश्वास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा समाजाला नोकरी, शिक्षणांमध्ये आरक्षण नाही; याचिका 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग
Next Article उपराष्ट्रपतींच्या ताफ्यात भीषण बॉम्बस्फोट; तीन ठार, १२ जखमी

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?