लंडन, 13 जुलै (हिं.स.)
बर्मिंगहॅम
येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला
इंग्लंडकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. अंतिम सामना गमावला असला तरी, ३-१
च्या अजिंक्य आघाडीसह अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाने मालिका ३-२
अशी जिंकली. भारतीय संघाने मालिका जिंकून इतिहास रचला आहे.
महिला
क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-२० मालिका विजय आहे.
यापूर्वी, भारताने इंग्लंडविरुद्ध ६ द्विपक्षीय
टी-२० मालिका गमावल्या होत्या. २००६ मध्ये डर्बी येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या
एकमेव टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला होता.जो दोन्ही संघांमधील टी-२० क्रिकेटमधील पहिला
सामना होता.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतरभारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी
गमावून १६७ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी
केली. शेफालीने २३ चेंडूत तिचे ११ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले.भारतीय संघाने ठेवलेल्या लक्ष्याचा
पाठलाग करताना इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर ५ विकेट
गमावून १६८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. दरम्यान, या सामन्यात भारतीय टी-२० कर्णधार
हरमनप्रीत कौरने तिचा ३३४ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कौरने माजी कर्णधार
मिताली राजला मागे टाकले. ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी
पहिली क्रिकेटपटू बनली आहे.
