Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांनी केली निषेध आंदोलने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांनी केली निषेध आंदोलने

admin
Last updated: 2025/04/29 at 2:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लंडन , 29 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापला आहे.पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने केलेल्या या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदूंचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरातील भारतीय प्रवासी आणि हिंदू समुदायाचे सदस्य रस्त्यावर उतरले आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत. पाकिस्तानवर जोरदार प्रहार झालाच पाहिजे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. लंडनपासून मेलबर्न आणि कोपनहेगनपासून काठमांडूपर्यंत भारतीय समुदायाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत.

लंडनमध्ये भारतीयांनी पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली, तर मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर आणि कोपनहेगनच्या रस्त्यांवरही संताप दिसून आला. सर्व ठिकाणी निदर्शकांनी भारतीय झेंडे फडकावले, बॅनर आणि फलक हातात घेतले आणि दहशतवादाविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच, हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. लंडनमधील आंदोलनांदरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेले वरिष्ठ पाकिस्तानी अधिकारी कर्नल तैमूर राहत यांनी भारतीय निदर्शकांकडे आक्षेपार्ह इशारा केल्याने तणाव वाढला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला, ज्यामध्ये त्या अधिकाऱ्याने ‘चाय फॅन्टॅस्टिक है’ असे लिहिलेले पोस्टर धरलेले दाखवले, जे २०१९ मध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या अटकेचा संदर्भ देते. या चिथावणीखोर वृत्तीमुळे निदर्शकांचा राग आणखी भडकला. पॅरिस, झुरिच, हेलसिंकी आणि स्पेनमधील विविध शहरांमध्ये मूक मोर्चे आणि मेणबत्ती पेटवून रॅली काढून भारतीय समुदायाने हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. निदर्शकांनी पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप केला आणि जागतिक समुदायाने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कोपनहेगनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय प्रवासीही जमले आणि त्यांनी दहशतवादाविरुद्ध कँडल मार्च काढत एकत्रितपणे आवाज उठवला. निदर्शने केवळ निषेधांपुरती मर्यादित नव्हती. जगभरातील भारतीय समुदायांनी आपापल्या देशांच्या सरकारांना निवेदने सादर करून दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची मागणी केली. मेलबर्नमधील भारतीय समुदायाने एकता दाखवली. दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल असेही आंदोलक म्हणाले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सलामीवीर वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
Next Article इराण बंदराच्या स्फोटातील मृतांची संख्या ६५ वर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?