Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

admin
Last updated: 2025/06/17 at 6:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

भारतीय दूतावासाने केले आपल्या नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली, 17 जून (हिं.स.) : इराणच्या तेहरान शहरावर होणाऱ्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीयांनी तत्काळ दुसऱ्या एखाद्या सुरक्षित शहरात स्थलांतरित व्हावे असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. तसेच तेहरानमधून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था होईपर्यंत त्यांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, सर्व भारतीय नागरिकांना तेहरान शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ दूतावासाशी संपर्क साधून त्यांचे स्थान आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली आहे. संपर्क क्रमांक +989010144557, +989128109115 आणि +989128109109 असल्‍याचेही निवेदनात नमूद केले आहे.इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावादरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सध्या तीन विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यात 1500 काश्मिरी आहेत. बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे वास्‍तव्‍यास आहेत.

इराणमध्‍ये अडकलेल्या 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सुनिश्चित करण्यासाठी भारताने इराणला आवाहन केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या जमिनीच्या सीमेवरून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार , इराणचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्मेनिया मार्गे बाहेर काढले जात आहे. आर्मेनियातील विद्यार्थ्यांना जॉर्जिया आणि नंतर पश्चिम आशिया मार्गे भारतात आणता येईल. 110 विद्यार्थ्यांचा पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला आहे. यापूर्वी, भारतीय दूतावासाने सोमवारी तेहरानमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
Next Article नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?