Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा, आजपासून विनाचालक दिल्ली मेट्रो धावणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा, आजपासून विनाचालक दिल्ली मेट्रो धावणार

Surajya Digital
Last updated: 2020/12/28 at 12:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दिल्लीच्या मेट्रो लाईनवर आज पहिल्यांदा चालकाविना मेट्रो धावणार आहे. दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनवर जनकपुरी वेस्ट ते बॉटनिकाल गार्डन कॉरिडॉर असा 37 किलोमीटरचा प्रवास ही मेट्रो करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी 11 वाजता या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. इतकच नाही तर आजपासून एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड (NCMC)च्या सेवेचंही उद्धाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार विना चालक मेट्रो धावल्यानंतर दिल्ली मेट्रोचं नावही जगभरातील अग्रणी मेट्रो सेवांमध्ये नोंदलं जाईल. जून 2021 पर्यंत पिंक लाईन म्हणजे मजलिश पार्क ते शिव विहार या मेट्रो मार्गावरील 57 किलोमीटर विना चालक मेट्रो धावण्याची शक्यता आहे. म्हणजे दिल्लीतील चाकरमान्यांना एकूण 94 किलोमीटरचा प्रवास विना चालक मेट्रोतून करता येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड म्हणजे NCMC ची सुविधाही मेट्रो प्रवाशांसाठी मोठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्डच्या माध्यमातून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर प्रवास करता येणार आहे. 2022 पर्यंत दिल्ली मेट्रोच्या सर्व लाईन्सवर कॉम मोबॅलिटी कार्डद्वारे प्रवासाची सोय होण्याची शक्यता आहे.

* दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा

मेजेंटा लाईनवर जनकपुरी ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन या मार्गावर सुरु होणाऱ्या विना चालक मेट्रो सेवेमुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. रोज लाखो प्रवासी कॉरिडॉरवर प्रवास करतात. त्यात आयटी कंपन्या आणि नोयडातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मेट्रो विना चालक असल्यामुळे वेळेचं खास बंधन असेल. त्याचबरोबर कधी उशीर झाला तर वेग वाढवून प्रवाशांना वेळेत त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #दिल्लीकरांसाठी #मोठादिलासा #आजपासून #विनाचालक #दिल्ली #मेट्रो #धावणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माढ्यात दिसला बिबट्या, चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण
Next Article हिंदू संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल १० अमेरिकी तरुणांचा सत्कार

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?