Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अ‍ॅपलचे भारतात उत्पादन करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांना भारताचे प्रत्युत्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अ‍ॅपलचे भारतात उत्पादन करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांना भारताचे प्रत्युत्तर

admin
Last updated: 2025/05/16 at 4:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 16 मे (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांना सूचना केली आहे की ‘अ‍ॅपल’ने आपल्या स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन थांबवून ते अमेरिकेत सुरू करावे.यावर भारताने म्हटलं आहे की “भारत आता जागतिक मोबाइल निर्मिती केंद्र बनत आहे. तसेच कंपन्या या राजकारणाचा नव्हे तर स्पर्धात्मकतेचा विचार करून निर्णय घेतात”.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया विचारली असताना अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यावर भाष्य करणं टाळलं, मात्र ते म्हणाले, “मेक इन इंडियामुळे उत्पादनाच्या क्षेत्रात भारत एक उत्तम भागीदार बनला आहे आणि अ‍ॅपलबाबत बोलायचं झाल्यास या कंपन्या जागतिक स्पर्धा लक्षात घेऊन निर्णय घेतात. या कंपन्या राजकीय वक्तव्यांनी प्रेरित निर्णय घेत नाहीत”. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेमुळे अ‍ॅपल कंपनी भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी कंपनीने दिल्याचा दावा केंद्र सरकारमधील सूत्रांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की “मी अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांच्याशी बोललो आहे. अ‍ॅपलने भारतात उत्पादन करण्याऐवजी अमेरिकेत करावे, अशी सूचना मी त्यांना केली आहे. टीम कूक हे माझे मित्र असून मी नेहमीच त्यांना चांगली वागणूक दिली आहे. मात्र, त्यांची कंपनी आता भारतात उत्पादन वाढवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मात्र, भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे माझ्या सूचनेनंतर अ‍ॅपल आता अमेरिकेतील उत्पादन वाढवणार आहे. अ‍ॅपल कंपनी जगभरात जितक्या आयफोन्सची निर्मिती करते, त्यामध्ये भारताचा १५ टक्के वाटा आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात केली होती. अ‍ॅपल ही देशातील सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीमुळे देशभरात सुमारे २ लाखांची रोजगारनिर्मिती होत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस आमदाराने उपस्थित केली शंका
Next Article भारत – पाकिस्तानदरम्‍यानचा युद्धविराम १८ मे पर्यंत वाढवला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?