Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहिल्या वनडेत भारताचा विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

पहिल्या वनडेत भारताचा विजय

Surajya Digital
Last updated: 2021/03/23 at 10:07 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पुणे : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयासोबत भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २५१ धावाच करू शकला. आता दुसरा वनडे सामना २६ मार्चला खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेला पहिला वनडे सामना भारताने ६६ धावांनी जिंकला. याबरोबरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे होत असलेल्या तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी देखील घेतली आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ४१.१ षटकात सर्वबाद २५१ धावा करता आल्या. भारताकडून पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिमाखात सुरुवात केली होती. त्यांनी १३५ धावांची सलामी भागीदारी रचली. मात्र रॉयला ४६ आणि अष्टपैलू बेन स्टोक्सला १ धावेवर बाद करत प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला मोठे धक्के दिले.

त्यानंतर मात्र इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने केवळ एकाकी झुंज दिली. त्याने ९४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. मात्र त्याला शार्दुल ठाकूरने बाद करत भारताच्या मार्गातील अडथळा दुर केला.

त्याच्यापाठोपाठ शार्दुलने एकाच षटकात कर्णधार ओएन मॉर्गन आणि जॉस बटलर यांना बाद करत भारताचा विजयाचा मार्ग आणखी सुखर केला. त्यानंतर मोईन अली आणि सॅम बिलिंग्सने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण अलीला भुवनेश्वर आणि बिलिंग्सला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्यानंतर सॅम करन आणि आदिल राशिद देखील स्वस्तात बाद झाले.

गोलंदाजी करताना भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ विकेट्स, भुवनेश्वर कुमारने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित २८ धावा करुन बाद झाला. पण यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखरला चांगली साथ दिली.

विराट आणि शिखर यांच्यात शतकी भागीदारी झाली. ही भागीदारी रंगत असतानाच विराट ५६ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल मोईन अलीने घेतला. त्यामुळे शिखर आणि विराटमधील १०५ धावांची भागीदारी तुटली. विराट पाठोपाठ काही वेळात श्रेयस अय्यर देखील ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच शिखरही ९८ धावा करुन बाद झाला. त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले.

शिखरनंतर हार्दिक पंड्यानेही केवळ १ धावेवर विकेट गमावली. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि कृणाल पंड्याने नाबाद अर्धशतके झळकावत भारताला ३०० धावांच्या पार नेले. कृणालने या सामन्यातून पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

भारताच्या डावातील ५० षटके संपली तेव्हा केएल राहुल ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६२ धावांवर आणि कृणाल पंड्या ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताने ५० षटकात ५ बाद ३१७ धावा केल्या आणि इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३ आणि मार्क वूडने १ विकेट घेतली.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #India's #victory i #the #first #ODI, #पहिल्या #वनडेत #भारताचा #विजय #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पदार्पणाच्या सामन्यात कृणाल पांड्याचा विक्रम! हार्दिकच्या मिठीत ढसाढसा रडला
Next Article संपादक, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?