Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इंडिगोचे संस्थापक गंगवाल 3.4 टक्के भांडवल विकणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इंडिगोचे संस्थापक गंगवाल 3.4 टक्के भांडवल विकणार

admin
Last updated: 2025/05/27 at 6:10 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 27 मे  : इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक राकेश गंगवाल यांचा मोठा निर्णय समोर आला आहे. गांगवाल इंडिगो कंपनीतील 3.4 टक्क्यांचे भांडवल विकणार आहेत. यातून त्यांना अंदाजे 6.831 कोटी रुपये मिळणार आहेत. गंगवाल आणि राहुल भाटिया यांच्यातील मतभेदामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राकेश गांगवाल आणि राहुल भाटिया यांनी 2006 मध्ये इंडिगो एअरलाइन्सची स्थापना केली होती. आता राकेश गंगवाल कंपनीतील आपली भागिदारी कमी करत आहेत. त्यांच्यासोबत चिंकारपू फॅमिली ट्रस्ट सुद्धा काही शेअर्स विकणार आहे. या ट्रस्टची देखभाल शोभा गंगवाल आणि जेपी मॉर्गन ट्रस्ट कंपनी करतात. गंगवाल आणि त्यांच्या ट्रस्टकडे इंडिगोचे जवळपास 13.5 टक्के शेअर्स आहेत. यातील 3.4 टक्के शेअर्स आता विकले जाणार आहेत. विक्रीसाठी असलेल्या प्रत्येक शेअरची किंमत 5.175 रुपये निश्चित करण्यात आली आहे. गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी आणि जे पी मॉर्गन इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्या हे शेअर्स विकायला मदत करत आहेत. या कंपन्या गुंतवणूकदार शोधतील आणि विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील.

या व्यवहारात एका शेअरची किंमत 5.175 रुपये असणार आहे. ही किंमत सोमवारी शेअर बाजार बंद झाला, त्यावेळच्या किमतीपेक्षा 4.5 टक्क्यांनी कमी आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना हे शेअर्स स्वस्त दरात मिळतील. राकेश गंगवाल हळूहळू इंडिगोमधील आपले भांडवल कमी करत आहेत. एकेकाळी गंगवाल आणि भाटिया हे इंडिगोचे सर्वात मोठे प्रवर्तक होते. पण आता गंगवाल आपला हिस्सा विकत असल्यामुळे कंपनीतील त्यांची भूमिका कमी होणार आहे. राकेश गंगवाल सध्या अमेरिकन बजेट कॅरियर साउथवेस्टच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 2022 मध्ये इंडिगोच्या बोर्डातून राजीनामा दिला होता. ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मधील काही नियम बदलण्यागंगवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 2022 मध्ये इंडिगोमधील त्यांचा हिस्सा 36.6 टक्के होता, तो आता 13.5 टक्के पर्यंत कमी केला आहे. याचा अर्थ त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले शेअर्स विकले आहेत.वरून त्यांचे राहुल भाटिया यांच्याशी वाद झाले होते.—————–

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटक : भाजपच्या 2 आमदारांची पक्षातून हकालपट्टी
Next Article पंतप्रधान मोदी सिंदूरची लाली कायम ठेवतील!

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?