नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलाशी लग्न करण्यासाठी प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढल्याची घटना मध्यप्रदेशमधील इंदौर येथे घडलीय. या हाय वॉल्टेज ड्रामामुळे खळबळ माजली होती. जवळपास ४५ मिनिटानंतर मुलीला होर्डिंगवरून खाली उतरवण्यात पोलिसांची चांगलीच त्रेधातिरपीट झाली.
लग्न न झाल्यास उडी मरून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवले. जवळपास ४५ मिनिटे हे नाट्य सुरू होते. इंदौरच्या परदे शीपुरा पुलाजवळ असलेल्या एका जाहिरात होर्डिंगवर मुलगी चढली. जर प्रियकरांसोबत लग्न झाले नाही तर उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकी मुलीने दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मुलीची समजूत काढण्यास सुरूवात केली. जवळपास ४५ मिनिटानंतर मुलीला होर्डिंगवरून खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. यानंतर मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वय १८ वर्ष आहे. ती एका अल्पवयीन मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. परंतु, मुलीचे कुटुंबीय लग्न दुसरीकडे करत असल्याचा दावा मुलीने केला. यावेळी मुलीचे कौन्सलिंग करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.