Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मावा विक्रीचे चित्रीकरण केले म्हणून तलवारीने मारहाण; अपघातामधील शिक्षा अपिलात निर्दोष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मावा विक्रीचे चित्रीकरण केले म्हणून तलवारीने मारहाण; अपघातामधील शिक्षा अपिलात निर्दोष

Surajya Digital
Last updated: 2022/01/13 at 7:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – मावा (mava) विकत असताना व्हिडिओ शूटिंग (video shutting) केल्याच्या कारणावरून तलवार आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत रामलिंग चंद्रकांत सकट (वय ३४) हे जखमी झाले. यावेळी चालू असलेले भांडण सोडविण्यास गेल्यानंतर त्यांना देखील मारहाण झाल्याने सुमित सुधाकर रूपनर (वय २९) आणि प्रभाकर गोपीनाथ बचुटे (वय ४३) हे दोघे देखील जखमी झाले. ही घटना आमराई परिसरातील औसे वस्ती येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली .

त्यांना दीपक राजगुरू, किरण राजगुरू आणि गणेश राजगुरू यांनी मारहाण केली. अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात (fouzdar cawadi police) झाली. यावेळी घराजवळ शिवीगाळ होत असल्याने बाहेर येऊन पाहत असताना लाथा ने पोटात मारल्याने रेणुका दीपक राजगुरू (वय २६ रा.औसेवस्ती) ही महिला देखील जखमी झाली. त्यांना रामलिंग सकट  आणि राजू सकट आदींनी मारहाण केली. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले, अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.

■ खाजगी आराम बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

सोलापूर – कोल्हापूर ते सोलापूर (kohlapur-solapur)  या खाजगी बस (private bus) मधून प्रवास करताना राजेश बबन ससाणे (वय ४२ रा. ऊळे ता.दक्षिण सोलापूर) हे मयत झाले. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली.

राजेश ससाणे हे मंगळवारी रात्री कोल्हापूर येथून सोलापूरकडे एमएच०९-२७५४  या खाजगी बसमधून प्रवास करीत होते. सकाळी  सोलापूरातील कमल हॉटेल नजीक बस थांबली. तेंव्हा सर्व प्रवासी उतरून गेले. स्लीपरवर ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. Stabbed as filmed selling mava; Innocent on appeal in punishment of accident

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याची माहिती बस चालकाने फौजदार चावडी पोलिसांना कळविली. पोलीस नाईक मस्के हे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ते उपचारापूर्वीच मयत झाले. अशी नोंद  पोलिसात झाली आहे.

□ अपघातामधील शिक्षा अपिलात निर्दोष

सोलापूर – मोहोळ (mohal ) येथील अपघातामध्ये आरोपीला झालेली ६ महिन्याची शिक्षा अपिलात अतिरिक्त सत्रन्यायाधीश व्ही.पी. पाटवदकर यांनी रद्दबातल ठरवली.

१ नोव्हेंबर २०१० रोजी पोखरापूर (ता. मोहोळ) येथे दुचाकीच्या धडकेने  इब्राहिम शेख हे सायकल स्वार गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात मोहोळच्या पोलीसांनी हनुमंत भगवान गोंडाळ (वय ५६ रा.पापरी ता.मोहोळ) याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  मोहोळच्या न्यायालयाने  गोंडाळ याला दोषी ठरवून याला दंड आणि ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षा विरुद्ध त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हनुमंत गोंडाळ यांना निर्दोष मुक्त केले.

या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड गुरुदत्त बोरगावकर, ॲड स्वप्निल सरवदे तर सरकारतर्फे ॲड दत्ता पवार यांनी काम पाहिले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Stabbed #filmed #selling #mava #Innocent #appeal #punishment #accident, #मावा #विक्री #चित्रीकरण #तलवारी #मारहाण #अपघात #शिक्षा #अपिलात #निर्दोष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक ! महाराष्ट्रात आतापर्यंत 265 पोलीसांचा कोरोनाने मृत्यू
Next Article बार्शीत विशाल गुंतवणुकीचा फुगा अखेर फुटला; 200 कोटी रुपयांचा फटका बसल्याची चर्चा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?