मंगळुरू, १० जून, (हिं.स.) : केरळच्या किनारपट्टीजवळ ९ जून रोजी आग लागलेल्या सिंगापूर-ध्वजांकित कंटेनर जहाजावरील १८ खलाशांना वाचवणारे भारतीय नौदलाचे आयएनएस सूरत हे जहाज काल रात्री १०.४५ वाजता नवीन मंगळुरू बंदरात दाखल झाले आहे.
एमव्ही वॅन हाई ५०३ नावाच्या जहाजावर कोलंबोहून मुंबईकडे जात असताना आग लागली होती. ही घटना बेपोर किनाऱ्यापासून सुमारे ७८ नॉटिकल मैलांवर घडली. या दुर्घटनेनंतर भारतीय नौदलाने तातडीने प्रतिसाद देत आयएनएस सूरतला तिथे पाठवले आणि २२ खलाशांपैकी १८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मंगळुरू पोलीस आयुक्तालयाच्या माहितीनुसार, बचाव केलेल्या १८ खलाशांमध्ये ६ जण जखमी झाले असून त्यातील २ जण गंभीर अवस्थेत आहेत. गंभीर जखमींची नावे लू यानली आणि सोनितुर हेनी अशी असून त्यांच्यावर मंगळुरूमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हलक्या स्वरूपाच्या जखमांमधील चार जणांची नावे समोर आली आहेत –
झू फाबाओ, गुओ लिनिनो, थिन थान थाय, क्यी झाव हतू
बाकी बचाव करण्यात आलेल्या १२ खलाशांना मंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
वेई च्हुन-जू, टॅग पेंग, कान हिउ वॉल, लिन चून चेंग, फेंग ली, ली फेंगगुआंग, थेत हत स्वे, गुओ एर्चुन, होलिक अश्यारी, सु वेई, चांग रेन-हान, वू वेन-ची.
समुद्रात अद्याप बेपत्ता असलेल्या ४ खलाशांची नावे: यू बो-फॉन्ग, सान विन, झेनेल अबिदिन, ह्सिएह चिया-वेन आहेत.
बचाव केलेल्या खलाशांपैकी ८ जण चिनी, ४ तैवानी, ४ म्यानमारचे, आणि २ इंडोनेशियाचे नागरिक आहेत.
मंगळुरू पोलीस आणि बंदर प्रशासनाने सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत.