Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी केली विठ्ठल – रुक्मिणीच्या मूर्तीची पाहणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी केली विठ्ठल – रुक्मिणीच्या मूर्तीची पाहणी

Surajya Digital
Last updated: 2022/05/08 at 7:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● दोन दिवसात येणार अहवाल : पदस्पर्श दर्शनाचा निर्णय बैठकीत होणार 

पंढरपूर : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची चरण झीज झाली आहे. नुकतेच विधानसभेचे उपसभापती निलम गो-हे यांनी देखील भेट देवून पाहणी केली होती. यानंतर आज रविवारी पहाटे औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी  पाहणी केली.  Archaeological Department inspects the statue of Vitthal-Rukmini

 

पुरातत्व विभागाने पाहणी केलेला  अहवाल येत्या दोन दिवसात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या अहवालाचे तंतोतंत पालन करण्यात येईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तिसह परिवार देवतांच्या मूर्तीचा संवर्धन करणं हे मंदिर समितीचे आद्य कर्तव्य आहे . मूर्ती संवर्धनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करणे, हा विषय पुरातत्व विभागाचा व मंदिर समितीचा नाही.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/536598804684520/

 

पदस्पर्श दर्शन सुरु ठेवून कश्याप्रकारे मूर्ती संवर्धन करता येईल यावर मंदिर समिती व पुरातत्व विभाग निर्णय घेईल.  मात्र पदस्पर्श दर्शन बंद करण्याबाबत मंदिर समिती व संपूर्ण वारकरी संप्रदायची बैठक घेतल्याशिवाय बोलणे आयोग्य आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांना दिली.

□ श्री विठ्ठलाची मूर्ती व्यवस्थित

श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची झीज या पाठीमागे नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन , गर्भगृहाची रचना तेथील तापमान या गोष्टी कारणीभूत आहे. परंतु श्री विठ्ठलाची मूर्ती व्यवस्थित आहे. श्री रूक्मिणी मातेच्या मूर्तीला दोन तीन दिवसात व्यवस्थित पुन्हा रासायनिक लेपन पुन्हा करावे लागणार आहे. पहाटे मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली. याचा अहवाल सादर करणार आहे.

 

– श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्व विभाग , औरंगाबाद

 

● आषाढी वारीची घोषणा; दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी भरणार

 

पुणे : आषाढी वारीची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख सोहळा ‘आषाढी वारी पालखी सोहळ्या’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारी साजरी होणार आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. 9 जुलैला ही वारी पंढरपुरमध्ये दाखल होणार आहे. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी करणार आहेत. तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/536401294704271/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #Archaeological #Department #inspects #statue #Vitthal-Rukmini, #पुरातत्व #विभाग #अधिकारी #विठ्ठल #रुक्मिणी #मूर्ती #पाहणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आषाढी वारीची घोषणा; या दिवशी पालखी पंढरपूरकडे करणार प्रस्थान
Next Article अकलूजला होणार राज्यातील पहिल्या महिला केसरी कुस्ती स्पर्धा 

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?