Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार

admin
Last updated: 2025/05/23 at 4:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अंबानी 75 हजार आणि अदानी 50 हजार कोटी गुंतवणार

नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.) : ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये येत्या 10 वर्षात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 5 वर्षात 75 हजार कोटी आणि अदानी समूह 10 वर्षात 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित रायझिंग नॉर्थ-इस्ट इन्व्हेस्टर्स समिट-2025 मध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानींनी याबाबत घोषणा केली.

याप्रसंगी मुकेश अंबानी यांनी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे धोरणात्मक व्हिजन सादर केले. भविष्यात, हे प्रदेश सिंगापूरसारख्या शेजारील देशांच्या यशाची प्रतिकृती बनलेले दिसतील असे अंबनी म्हणाले. तसेच ईशान्येकडील 8 राज्यांचा उल्लेख त्यांनी ‘अष्टलक्ष्मी’ असा केला. रिलायन्स इंडस्ट्रीज ईशान्येकडील राज्यांत गुंतवणूक दुपटीने वाढवेल. सर्व शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणेल. तसेच या प्रदेशात सौरऊर्जेची निर्मिती वाढवणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. ईशान्य भारतातील रिलायन्सची सध्याची गुंतवणूक 30 हजार कोटी रुपये आहे. आता ही गुंतवणूक 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे.

यासोबतच अदानी समूह आगामी 10 वर्षांत ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली. अदानी समूहाने 3 महिन्यांपूर्वी आसाममध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. यासोबतच गौतम अदानी यांनी आगामी 10 वर्षांत संपूर्ण ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक विमानतळ, शहर गॅस वितरण, ट्रान्समिशन, सिमेंट आणि रस्ते पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये असेल. यावेळी गौतम अदानी म्हणाले की, गेल्या दशकात, ईशान्येकडील प्रदेशात भारताच्या विकासाच्या गाथेचा एक नवीन अध्याय उलगडत आहे. विविधता, लवचिकता आणि वापर न झालेल्या क्षमतेची ही एक गोष्ट आहे. या उदयामागे एका नेत्याची दूरदृष्टी आहे जो सीमेच्या मर्यादा मानत नाही. केवळ सुरुवात करतो. पंतप्रधान, तुम्ही जेव्हा पूर्वेकडे जलद आणि प्रथम लक्ष द्या, असे म्हटले, तेव्हा तुम्ही ईशान्येचे लक्ष वेधले असे अदानी यांनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत 4 नक्षलवादी ठार
Next Article इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?