Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल २०२५ : भारतात परतण्यासाठी बीसीसीआयकडून विदेशी खेळाडूंवर दबाव?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आयपीएल २०२५ : भारतात परतण्यासाठी बीसीसीआयकडून विदेशी खेळाडूंवर दबाव?

admin
Last updated: 2025/05/16 at 5:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कैनबरा, 16 मे (हिं.स.) : आयपीएल उर्वरित सामना उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.१७) पासून पुन्हा सुरु होणार आहे. यासाठी मायदेशी परतलेले अनेक विदेशी खेळाडू आता भारतात परत आले आहे, तर काहीनी भारतात येण्यास नकार दिला आहे.अशातच, भारतात परत येण्यासाठी बीसीसीआयकडून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिशेल जॉन्सनने केला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

मिशेल जॉन्सनने नुकताच एक लेख लिहिला आहे. या लेखात त्याने यासंदर्भातील गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला, “क्रिकेटपटूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर मला भारतात परत जाऊन आयपीएल पूर्ण करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो माझ्यासाठी सोपा असेल. मी स्पष्टपणे नकार देईन. माझ्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, पैसा नाही.”पुढे तो म्हणाला, “भारतात परत जायचे की नाही, हा वैयक्तिक निर्णय आहे. परत जाण्यासाठी खेळाडूंवर दबाव टाकला जात आहे.

माझ्या मते, अशा वेळी कोणावरही दबाव टाकला जाऊ नये किंवा सक्ती केली जाऊ नये, मग ते आयपीएल असो वा पाकिस्तान सुपर लीग.” दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्यानंतर बहुतेक विदेशी खेळाडू आपल्या देशात परत गेले आहेत. त्यामुळे स्पर्धा पुन्हा सुरू होत असताना सर्व संघांसमोर विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापैकी काहींनी परत येण्याची तयारी दाखवली आहे, तर काहींनी स्पष्टपणे नकार दिला आहे. ज्या विदेशी खेळाडूंनी भारतात परत येण्यास नकार दिला,

त्यापैकी बहुतांश खेळाडू दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आहेत.याचे कारण म्हणजे 11 जून रोजी होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका. अशा वेळी हे खेळाडू आपल्या संघाचा भाग असून, त्यांच्या क्रिकेट बोर्डांनी त्यांना परत जाण्यास मनाई केली आहे. बीसीसीआयने आयपीएलसाठी नवे वेळापत्रक जारी केले असून, उद्यापासून या सामन्यांना पुन्हा सुरुवात होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनसेने वेधले लक्ष : निवासी भागातील पोलिस कर्मचारी इमारती भग्नावस्थेत !
Next Article जम्मू-काश्मिरात एसआयएचे धाडसत्र

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?