Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आयपीएलच्या तारखा ठरल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आयपीएलच्या तारखा ठरल्या

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 2:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं असून आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीच याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

’19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,’ असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट झाले होतं. आयपीएल गव्हर्निंग समितीची पुढील आठवड्यात यासंदर्भात बैठक होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक आणि इतर बाबींवर शिक्कामोर्तब होणार आहे.

IPL कौन्सिल चेअरमन ब्रिजेश पटेल ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आयपीएल 2020चे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू केले जाऊ शकतात. भारतीय वेळेनुसार हे सामने 8 वाजता सुरू होतील, तर 7.30 वाजता टॉस होईल. याआधी काही सामने दुपारी 4 वाजताही आयोजित करण्यात येत होते, मात्र यंदा युएईमध्ये ही स्पर्धा होत असल्याचे सर्व सामने 8 वाजताच खेळवले जातील.

युएईमध्ये आयपीएल येऊ शकेल अशी बातमी येताच तेथील क्रिकेट असोसिएशनने तयारी सुरू केली.  याआधी 2014 मध्ये आयपीएलचे निम्मे सामने युएईमध्येच घेण्यात आले होते आणि भारतीय चाहत्यांनी त्याचा प्रचंड आनंद लुटला होता. याशिवाय 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन केले होते.

आयपीएलचं बिगुल 19 सप्टेंबर म्हणजे आजपासून बरोबर 57 दिवसांनी वाजणार आहे. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे.

“दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि आयसीसी अॅकॅडमी असलेले दुबई स्पोर्ट्स सिटी सामन्यांसाठी सज्ज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 खेळपट्ट्या आहेत, ज्यामुळे येथे खेळपट्टी तयार करण्यात कोणतीही अडचण नाही”

सलमान हनीफ – क्रिकेट इव्हेंटचे प्रमुख, दुबई स्पोर्ट्स सिटी

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

TAGGED: #आयपीएल #तारखाठरल्या #क्रिकेट #आनंदाचीबातमी #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे निधन
Next Article कोरोनात जगभरातील उद्योगावर ‘संक्रांत’ आली असताना ‘या’ उद्योगाची माञ ‘दिवाळी’

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?