Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल : पाचवे आयपीएल विजेतेपदाचा मुंबईने रचला इतिहास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

आयपीएल : पाचवे आयपीएल विजेतेपदाचा मुंबईने रचला इतिहास

Surajya Digital
Last updated: 2020/11/11 at 10:07 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

दुबई : आयपीएल २०२० मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले.

कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. मुंबईचे आयपीएल स्पर्धेचं पाचवं जेतेपद आहे.

मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही.

अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने १५७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने १८.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावा करत अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशनने नाबाद ३३ धावा केल्या.

त्याचबरोबर क्विंटन डिकॉकने २०, सुर्यकुमार यादवने १९ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात खारीचा वाटा उचलला.  दिल्लीकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किएने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडा आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. त्यांची सुरुवात खराब झाली होती. सलामीला आलेला मार्कस स्टॉयनिस शुन्यावरच बाद झाला. मात्र नंतर रिषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळताना चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. तसेच या दोघांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ५६ धावा केल्या. तर अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. त्यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर नॅथन कुल्टर नाईलने २ विकेट्स आणि जयंत यादवने १ विकेट घेतली.

* पुरस्कार

– मॅन ऑफ द मॅच- ट्रेंट बोल्ट

– इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर- देवदत्त पड्डीकल

– फेअरप्ले- मुंबई इंडियन्स

– मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर-जोफ्रा आर्चर

– परपल कॅप-कागिसो रबाडा

– ऑरेंज कॅप-के.एल. राहुल

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #आयपीएल #पाचवेआयपीएल #विजेतेपदाचा #मुंबईने #रचलाइतिहास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Next Article भारतात मोबाईल डेटाचा वेग मंदच; डेटास्पीडमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?