Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईचा पहिला विजय; केकेआरला हरवले, विजयाचा श्रीगणेशा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

मुंबईचा पहिला विजय; केकेआरला हरवले, विजयाचा श्रीगणेशा

Surajya Digital
Last updated: 2020/09/24 at 7:15 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अबूधाबी : रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता संघाचा 49 धावांनी पराभव करत विजय साकारला. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर आज मुंबईने विजयाचं खात उघडलं. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.

कोलकता विरोधात नेहमीच यशस्वी ठरणाऱ्या मुंबई इंडियन्सने ही परंपरा कायम राखली आणि आयपीएलच्या 13 व्या हंगामात विजयाचा श्रीगणेशा केला. 49 धावांनी विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने निर्णायक 80 धावांची खेळी केली.

कोलकताविरुद्ध मुंबईने आजच्या सामन्यापूर्वी 10 पैकी नऊ लढती जिंकल्या आहेत. रोहितच्या शानदार खेळीमुळे 195 धावा करणाऱ्या मुंबईने कोलकता संघाला 146 धावांवर रोखले. अमिरातीमधील मुंबईचा हा पहिला विजय ठरला.

चेन्नईविरुद्ध गोलदाजीत केलेल्या चुका आज मुंबई सुधारल्या आणि पहिल्यापासून त्यांच्या डावावर वर्चस्व मिळवले. गिल आणि नारायण ही सलामीची जोडी झटपट बाद केली त्यानंतर भले दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांना डाव सावरला, परंतु आवश्‍यक धावांचा बोजा वाढत गेला. त्यातच ते बाद झाले.

मुंबईला भिती होती ती आंद्रे रसेल आणि मॉर्गन यांच्याकडून परंतु बुमारने आपल्या एकाच षटकात या दोघांना बाद करुन मुंबईचा विजय निश्‍चित केला. सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमवल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबईला सुरवातीला धक्का बसला. गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा डिकॉक बाद झाला. परंतु कर्णधार रोहितला चांगला सूर सापडला. कोलकता संघाविरुद्ध रोहितचे बॅट हमखास तळपते आजही ती बहरली. 148 च्या स्ट्राईक रेटने त्याने 54 चेंडूत 80 धावा केल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. त्यावेळी मुंबई द्विशतकी मजल मारणार हे निश्‍चित वाटत होते. सूर्यकुमार बाद झाल्यावर आलेल्या तिवारीने छोटेखानी 21 धावांची खेळी केली. परंतु ज्याच्याकडून आशा होत्या त्या हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा निराशा केली, तो स्वयंचीत झाला.

150 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या पोलार्डने अखेरच्या षटकांत आक्रमता दाखवल्यामुळे मुंबईला 195 धावा करता आल्या.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #मुंबईचा #विजय #श्रीगणेशा #केकेआर #हरवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धर्मगुरू, सामाजिक संस्था ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत होणार सहभागी
Next Article मराठा आरक्षणाच्या चर्चेस नरेंद्र मोदींची टाळाटाळ ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना उत्तर नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?