Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएलमधील विराट कोहलीच्या आरसीबी संघात आदित्य ठाकरेची निवड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळमहाराष्ट्र

आयपीएलमधील विराट कोहलीच्या आरसीबी संघात आदित्य ठाकरेची निवड

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 4:48 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आयपीएलमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (आरसीबी) संघात आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने ही बातमी दिली आहे. यंदा आयपीएल हे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयपीएलसाठी किती खेळाडू युएईमध्ये न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण युएईमध्ये जर फलंदाजांना सराव करायचा असेल तर त्यांना जास्त आणि विविधता असलेले गोलंदाज लागतील. त्यासाठीच विदर्भाचा वेगवान गोलंदाज असलेल्या आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य आता आरसीबीच्या संघाकडून युएईला जाणार आहे.

आरसीबीने खेळाडूंना चांगला सराव मिळावा, यासाठी एका डेव्हलपमेंट चमूची निवड करण्यात आली आहे. या चमूतील खेळाडू आरसीबीच्या संघातील मुख्य खेळाडूंना सराव देण्याचे काम करतील. गेल्या काही वर्षांपासून आदित्य हा सातत्याने दमदार गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची निवड आरसीबीच्या या चमूमध्ये करण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे.

आदित्यला फक्त फलंदाजांना सराव देण्यासाठी आरसीबी संघाबरोबर युएईला नेणार आहेत. पण नेट्समध्ये सराव करत असताना जर त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली तर त्याला संघातून आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आदित्य सरावात नेमकी कशी गोलंदाजी करतो, यावर त्याचा आयपीएलमधील पदार्पण अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे.

* आदित्य ठाकरेंविषयी

निवड झालेला आदित्य हा अकोल्याचा असून पूर्ण नाव आदित्य शैलेश ठाकरे आहे. त्यांच्या वडिलाचे नाव प्रा.डॉ. शैलेश ठाकरे आहे. वडिलांने त्याचे या निवडीमुळे कौतुक केले असून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. यापूर्वीसुद्धा आदित्यने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली मलेशियात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.  2018  साली झालेल्या युवा विश्वचषकातही आदित्यने चांगली कामगिरी केली होती. या विश्वचषकानंतर आदित्य प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आदित्यने भारतातील स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याची निवड यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये करण्यात आली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

TAGGED: #आयपीएल #आरसीबीसंघ #विराटकोहली #आदित्यठाकरे #निवड #अकोला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांना मोठी जबाबदारी मिळणार; लवकरच घोषणा
Next Article पत्नीची छेडछाड काढत असल्याच्या रागातून बाप – लेकाने सालगड्याला गळा आवळून संपवले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?