Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून रुग्णाचा लोखंडी रॉड मारुन खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून रुग्णाचा लोखंडी रॉड मारुन खून

Surajya Digital
Last updated: 2021/09/15 at 9:24 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापुरातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात एका रुग्णाने सलाईनच्या लोखंडी रॉड मारून दुसऱ्या एका ७० वर्षीय रुग्णाचा खून केला. ही धक्कादायक घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बी ब्लॉक तिसरा मजल्यावरील मेल सर्जरी वॉर्डात घडली.

याप्रकरणी सौरभ संजय राऊत (वय २७, रा.बी-१ कॉटर, सिव्हिल हॉस्पिटल) यांनी सरकारतर्फे सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून युसुफ मौलाली पिरजादे (वय ३४, रा. तिरंगा नगर, विडी घरकुल, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉक मधील तिसरा मजल्यावरील सर्जरी वॉर्डात मयत ७० वर्षीय ण गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून उपचार येत होता. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी युसुफ पिरजादे याला फुफुसाचा आजाराबाबत त्याच वॉडत दाखल करण्यात आले.

मयत रुग्ण आणि युसूफ दोघे शेजारी शेजारी बेडवर होते. १३ रोजी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी वृद्धाला युसूफ याने मुझे इसमें शैतान दिखता है असे म्हणत सलाईनच्या लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. हे पाहून आजूबाजूच्या रुग्णांनी यावरून आरडाओरड केल्यानंतर सिव्हीलमधील कर्मचाऱ्यांनी जखमी वृध्दाला उपचारासाठी दुसऱ्या वॉर्डात दाखल केले. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे व सदर बझार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

घटना उघडकीस आल्यावर नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी भेट दिली. ते म्हणाले की, शहरातील बेघरांची सोय करणे हे महानगरपालिकेचे काम आहे. घरांसाठी राहण्याची सोय करावी, बेघर आजारी पडल्यानंतर जरी शासकीय रुग्णालयात दाखल झाला तरी सुध्दा बेघर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्याला राहण्याचा आसरा पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेने बेघरांसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.

या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खुनाच्या प्रकारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत नाही. बेघरांच्यामध्ये मोठी दुर्गंधी सुटली आहे. अस्वच्छतेच्या कारणावरूनच दोघा रुग्णांमध्ये वाद झाल्याची चर्चा सिव्हिल परिसरात आहे.

युसूफ पिरजादे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मृताची रात्रीपर्यंत ओळख पटली नव्हती. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास पोसई वाघमारे हे करीत आहेत.

* विवाहितेला घरात उपाशी कोंडून छळ; पती सहा जणांवर गुन्हा

सोलापूर : विवाहितेला घरात उपाशी कोंडून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याची घटना दि.१९ जानेवारी ते १९ एप्रिल २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी रजिया शफिक शेख (वय-२८,रा. किसान संकुल नगर,सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शफिक शेख, अब्दुल सुलतान शेख, रफिक शेख, फातिमा,नशिमा,बिस्मिल्ला (सर्व.रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संस्थेत आरोपींनी मिळून फिर्यादी रजिया शेख यांना तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही व मानपान केला नाही. तू आता माहेरून पैसे सोने व संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी मोठी रक्कम घेऊन ये म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर रजिया शेख यांना घरात उपाशी कोंडून ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.  या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून,  या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Murder #patient #hitting #ironrod #patient #civilhospital, #सिव्हिल #हॉस्पिटल #रुग्णाकडून #रुग्णाचा #लोखंडीरॉड #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भर रस्त्यात तरूणीला मिठीत घेत डिलिव्हरी बॉयने केला किस करण्याचा प्रयत्न
Next Article घराच्या वाटणीवरून काका पुतण्यात तलवार हल्ला, सराईत गुन्हेगारावर एमपीडीए

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?