Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

admin
Last updated: 2025/06/22 at 3:41 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

पाकिस्तानवर खासदार ओवैसी यांची घणाघाती टीका

हैदराबाद, 22 जून (हिं.स.) : अमेरिकेने इराणच्या 3 अणु प्रकल्पांवर केकेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्ताननेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफरास केली होती. त्यावरून ओवैसींनी पाकिस्तानला टोला लगावला. ट्रम्पच्या नावाची शिफारस यासाठीच केली होती का…? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इस्राईल आणि ईरान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हस्तक्षेपावर ओवैसी म्हणाले की, “हेच कारण होतं का की पाकिस्तानने ट्रम्पसाठी शांतता पुरस्काराची शिफारस केली ? आणि याच कारणासाठी का पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत लंच केला होता ? आज हे सगळे उघडे पडले आहेत. असे ओवैसी म्हणालेत. अमेरिकेचे धोरण फक्त इस्रायली सरकारचे गुन्हे लपवण्याचे आहे. गाझामध्ये नरसंहार सुरु आहे. याबाबत कोणीही बोलत नाही. इस्रायलकडे किती अणुबॉम्ब आहेत हे कोणी का विचारत नाही ? अमेरिकेने इराणमधील तीन-चार ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याने त्यांना रोखता येणार नाही. पुढील 5 ते 10 वर्षांत इराण देखील ते करेल, इतर देश देखील ते करतील कारण आता त्यांना हे समजले आहे की अणुबॉम्ब असणे हाच इस्रायलच्या वर्चस्वाविरुद्धचा एकमेव प्रतिबंध आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केले आहे. मला आशा आहे की, केंद्र सरकार आज झालेल्या इराणी अणुऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करेल, असे नमूद करत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पॅलेस्टिनी लोकांची कत्तल केली आहे. इतिहास नेतन्‍याहूंना पॅलेस्टिनी लोकांचा कसाई म्हणून लक्षात ठेवेल अशी टीकाही ओवैसी यांनी केली.

यापूर्वी इस्राईलने ईरानच्या अणु प्रकल्पांवर हल्ले केले होते, मात्र हे प्रकल्प भूमिगत असल्याने इस्राईलच्या हल्ल्यांमुळे फारसा धोका निर्माण झाला नव्हता. इस्राईलकडे असे शस्त्र नाहीत जे भूमिगत संरचना उद्ध्वस्त करू शकतात. या पार्श्वभूमीवर अमेरिका यात उतरली आणि तिने आपल्या अत्यंत शक्तिशाली बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करून “मॅसिव ऑर्डिनन्स पेनिट्रेटर” (बंकर बस्टर बॉम्ब) वापरले, जे जमिनीखालीही जबरदस्त विनाश घडवून आणू शकतात. अमेरिकेने ईरानमधील फोर्डो, नतांज आणि इस्फाहान या 3 प्रमुख अणु ठिकाणांना लक्ष्य केले.पाकिस्तान 2026 साली अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे जाहीर केले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे मोठा युद्ध टळले. ही घोषणा ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे स्वागत केल्यानंतर केवळ 3 दिवसांनी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याच्या वचनावरच मुनीर यांना व्हाईट हाऊसला आमंत्रित करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला होता. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर आम्ही युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे भारताने जागतिक व्यासपीठावर स्पष्ट केले आहे.

You Might Also Like

राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन

चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन

प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
Next Article सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?