Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना रुग्णालयाच्या उद्‌घाटनाला झालेल्या गर्दीचा बसला फटका; हजेरी लावणा-या अनेकांचा बाधितांमध्ये समावेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोरोना रुग्णालयाच्या उद्‌घाटनाला झालेल्या गर्दीचा बसला फटका; हजेरी लावणा-या अनेकांचा बाधितांमध्ये समावेश

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 5:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर वाळवा आणि शिराळा तालुक्‍याला कोरोनाचा दणका बसल्याची चिन्हे दिसू लागले अहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात काही पदाधिकारी, नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आठ दिवसापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य मंत्री विश्‍वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोविड उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. प्रमुख मंत्री उपस्थित असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी हजर होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उपजिल्हा रुग्णालयात उद्घाटन सोहळा पार पाडून येथील राजारामबापू नाट्यगृहात आढावा बैठक पार पडली. काही दिवसातच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत.
काही नगरसेवक, काही अधिकारी व काही नेते गेल्या आठ दिवसात एक एक करुन कोरोना बाधीत निष्पन्न होऊ लागले आहेत.

उपस्थिती लावणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमानंतर अनेकांनी स्वतःला कोरोनाबाधीत झालेल्या प्रशासकीय अधिकारी व नेत्यांच्या संपर्कात आल्याने घरात क्वारंटाईन करुन घेतले आहे. कोरोनाचा विळखा गच्च आवळू लागला आहे.

मोजक्‍याच लोकांनी हा उद्घाटन सोहळा पार पाडायला पाहिजे होता. मात्र तसे न झाल्याने अनेकांना बाधा झाल्याची चर्चा सुरु आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी व अधिकारी पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांनी मात्र पॉझीटीव्ह आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार न घेता कोल्हापूर, मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी धूम ठोकली आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #सांगली #इस्लामपूर #टाटा #रुग्णालय #फटका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकारविरोधात एकत्र या, सुप्रिम कोर्टात जाऊया; सोनिया गांधींचे सात मुख्यमंत्र्यांना विनंती
Next Article सोनिया गांधींसमोर ममतांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतुक; लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं, अभिमानाने सांगितले

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?