Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांवर केला हल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांवर केला हल्ला

admin
Last updated: 2025/06/22 at 3:29 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 22 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या युद्धात आता अखेर अमेरिकेनेही उडी घेतली आहे.अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली. तर दुसरीकडे इस्रायलनेही इराणला मोठा धक्का दिला आहे. इस्रायलने इराणच्या एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांना लक्ष्य केले.मध्य इराणमध्ये सुमारे ६० इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे असे इस्रायल डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्यांचा एक भाग म्हणून, आयएएफच्या विमानांनी आणखी तीन इराणी एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला. गेल्या आठवड्यात, तेहरानमध्ये इस्रायली हल्ल्यात दोन एफ-१४ विमाने नष्ट करण्यात आली होती.

अमेरिकेत बनवलेले एफ-१४ टॉमकॅट्स १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणला पुरवले गेली होती आणि ती अजूनही वापरली जात होती. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी(दि.२२) भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता हा हल्ला झाला. फोर्डोवर बॉम्बचा एक संपूर्ण साठा टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला धमकी देत त्यांनी आता शांतता ठेवाव,

जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर आणखी मोठे हल्ले केले जातील, असं म्हटलं. इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती देशाला दिली. “या हल्ल्यांचे उद्दिष्ट जगातील दहशतवादाला प्रायोजित करणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या देशाकडून निर्माण झालेल्या अणु धोक्याला आळा घालणे आहे. मागच्या ४० वर्षांपासून इराण इस्राइलला, अमेरिकेला संपवण्याची भाषा बोलत आहे. इराणने आमच्या अनेक लोकांना मारले आहे. लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. —————

You Might Also Like

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अणुकेंद्रावरील हल्ल्यानंतर इराणचा अमेरिकेला थेट इशारा
Next Article पाण्यापासून होणार ग्रीन-हायड्रोजनची निर्मिती

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?