Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे मानले आभार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचे मानले आभार

admin
Last updated: 2025/06/22 at 3:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जेरुसलेम , 22 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इस्रायलने मदत मागितल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेने ताकदीने काम केले आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. “अमेरिका खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी असं काही केलं आहे जे पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहासात नोंद आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवट, जगातील सर्वात धोकादायक शस्त्रे संपवण्याचे काम केले,” असं नेतन्याहू यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो की,’शांतता शक्तीतून येते. आधी ताकद दाखवली जाते, नंतर शांतता येते,’ आज रात्री, ट्रम्प आणि अमेरिकेने पूर्ण ताकदीने त्यांचे काम केले आहे,” असं म्हणत नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लष्करी कारवाईबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले. अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन सैन्याने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला असून सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचल्याचे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी कारवाईबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आनंद व्यक्त करत सैनिकांचे अभिनंदन केले. “लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकन सैन्य सुरक्षितपणे अमेरिकेत परतत आहे. आपल्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं ट्रम्प यांनी म्हटलं.

You Might Also Like

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत 1117 भारतीय मायदेशी परतले
Next Article अणुकेंद्रावरील हल्ल्यानंतर इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?