Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या रंगपंचमीत दीडशे वर्षानंतर घडलं ‘ते’ पण लयच भारी ! राष्ट्रीय एकात्मतेचा रंगारंग!!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूरच्या रंगपंचमीत दीडशे वर्षानंतर घडलं ‘ते’ पण लयच भारी ! राष्ट्रीय एकात्मतेचा रंगारंग!!

admin
Last updated: 2025/03/20 at 11:58 AM
admin
Share
3 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर: लोधी समाजाच्या सोलापुरातील रंगपंचमीला दीडशे वर्षाची परंपरा आहे. या दीडशे वर्षाच्या परंपरेत कधी असं घडलं नाही ते वेगळं कालच्या बुधवारच्या रंगपंचमीत घडलं. एकीकडे औरंगजेबाची कबर खोदण्यावरून महाराष्ट्रात जाती आणि धार्मिकतेची तेढ निर्माण होत असताना, हिंदू-मुस्लिमांच्या सलोख्याला हरताळ फासला जात असताना आणि त्यातून वातावरण दूषित करण्याच्या घटना घडताना सोलापुरात मात्र काल हिंदू आणि मुस्लिम यांनी सलोखा दाखवत एकात्मतेचे दर्शन घडवलं. हिंदू धर्मियांनी काढलेल्या रंगपंचमीच्या मिरवणुकीवर फुलांची उधळण करत शिवाय या मिरवणुकीत सहभागी होऊन येथील मुस्लिम समाजाने ‘हम सब एक है’ चा नारा दिला. लोधी समाजाने काढलेल्या या मिरवणुकीत हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही एकत्र दिसल्याने महाराष्ट्रापुढं राष्ट्रीय एकात्मतेचा आणि समभावाचा आदर्श निर्माण झाला.

देशात सर्वात आधी स्वातंत्र्य उपभोगल्याचा इतिहास असलेल्या सोलापुरात रंगपंचमीला अवघा रंग एक झाला. हिंदू आणि मुस्लिम यांनी समानतेमधून रंगपंचमीची मिरवणूक काढली हे अनोखा उदाहरण समोर आलं. रंगपंचमीच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्याबरोबरच मिरवणुकीत सहभागी होण्याच्या मुस्लिम धर्मीयांच्या भावनांची कदर करत हिंदूधर्मीयांनी त्यांचं स्वागत केलं. हिंदू धर्मियांच्या रंगपंचमीत सहभागी होऊन जातीय आणि धर्माचे रंग फासणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन इथल्या हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांनी घातलं. दीडशे वर्षात कधी नाही घडलं पण योग्य वेळी आणि लईच भारी घडलं.

महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापुरात लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. 150 वर्षांपासून लोधी समाज बांधवांकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात फक्त लोधी समाजच नाही तर परिसरात राहणारे राजपूत समाज, तेली समाज, मोची समाज, मुस्लीम समाज इतर सर्व समाज बांधव मिळून अतिशय उत्साहात हा उत्सव दरवर्षी साजरा करतात. मुस्लिम बांधवांनी मुस्लिम बांधवांनी रंगपंचमीच्या मिरवणुकीत सहभागी होण्याबद्दल”अरे भाई क्या बात है!” अशा प्रतिक्रिया उमटल्या.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरात लोधी समाज बांधवांचे रंगपंचमी हे अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होत असते” शंभर वर्षाची परंपरा जपत लोधी समाज बांधवांच्या वतीने बैलगाडी आणि रंग गाडीचे नियोजन करण्यात येत असते बैलगाडी मध्ये बसून एकमेकांवर रंगाचे उधळण करत एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करण्यात येत असतो” लोधी समाज बांधव रंगगाडी मिरवणूक हे जसे लष्कर परिसरातील जगदंबा चौक या ठिकाणी आले” तसे मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने रंगगाड्यावर फुलांचे वर्षाव करत त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या”

दरम्यान यावेळी अनेकांचे भुया उंचावले” डोक्यावर टोपी” हातात फुलं आणि मुस्लिम बांधवांचे फुलांचे वर्षाव पाहून सारेच थक्क झाले” जसे जसे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फुलांचे वर्षाव करण्यात येत होते” तसे तसे हिंदू समाज बांधवांच्या वतीने टाळ्यांचा एकच गजर करत होते” जय श्रीराम च्या घोषणा हम सब एक है च्या घोषणा यावेळी ऐकू यास मिळाले दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने वाहिद बिजापुरे यांनी रंगगाडी मिरवणुकीचे स्वागत करत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या तर माजी नगरसेवक बडूरवाले यांनी मुस्लिम समाज बांधवांचे आभार मानले.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काय सांगताय? वाळू चोरांच्या मुसक्या वळल्या, पण ‘कुठे’ ?
Next Article दक्षिण काशी पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात ‘हे’ घडलं!

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?