Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 3:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

इस्लामाबाद, 3 जून, (हिं.स.)। पाकिस्तानमधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे. जैश-ए- मोहम्मदचा सिनियर कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसर याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

अब्दुल अजीज इसार हा पंजाब प्रांतातील भाक्कर जिल्ह्यातील कल्लूर कोट परिसरातील अशरफवाला येथील रहिवासी होता आणि जैशच्या उच्च नेतृत्वात सहभागी होता. त्याच्या मृत्यूमुळे गुप्तचर वर्तुळापासून ते दहशतवादी नेटवर्कपर्यंत खळबळ उडाली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या या कुख्यात दहशतवाद्याने भारताविरुद्ध विष ओकले होते.

पण याचा मृत्यू कसा झाला हे अजूनही गूढ आहे. तो पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये मृतावस्थेत आढळला, जिथे जैशचे मुख्यालय देखील आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. तो बराच काळ भारतविरोधी कारवाईमध्ये सहभागी असायचा तसेच अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार देखील मानला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जैशचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरमधील ‘मरकझ’ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तसेच दहशतवादी संघटनेचे इतर वरिष्ठ नेते आणि कट्टर समर्थक तेथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मौलाना अझीझ याचा मृत्यू जैशसाठी मोठा धक्का मानला जात आहे,

कारण तो संघटनेच्या विचारसरणी आणि दहशतवादी भरती मोहिमेचा एक महत्त्वाचा चेहरा होता. अब्दुल अजीज हा तोच दहशतवादी होता ज्याने गेल्या महिन्यात जैशच्या रॅलीत भारताविरुद्ध विष ओकले होते. त्याने व्यासपीठावरून धमकी दिली होती.

अब्दुल अजीजच्या मृत्यूवर जैश आणि पाकिस्तान सरकारने मौन बाळगले आहे. जैशशी संबंधित सोशल मीडिया अकाउंटने त्याच्या मृत्यूची आणि अंत्यसंस्काराची पुष्टी केली आहे, परंतु मृत्यूच्या कारणाबद्दल माहिती दिलेली नाही.

अब्दुल अजीज जैश-ए-मोहम्मदच्या पंजाब प्रांतात आणि विशेषतः बहावलपूर, रावळपिंडीसारख्या भागात तरुणांना भारताविरुद्ध कट्टरतावादी बनवत आणि भडकावत असे. त्याचा मृत्यू जैशसाठी, विशेषतः स्थानिक भरती आणि ब्रेनवॉशिंग नेटवर्कसाठी मोठा धक्का आहे.

You Might Also Like

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर

जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन

भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाकडून ५१ कोटींचे कोकेन जप्त
Next Article दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे

Latest News

‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन
देश - विदेश June 18, 2025
भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’
देश - विदेश June 18, 2025
बिहार : वीज कोसळून 12 जणांचा मृत्यू
देश - विदेश June 18, 2025
नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?