Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जम्मू-काश्मीर : आतापर्यंत 7 दहशतवाद्यांची घरे उध्वस्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जम्मू-काश्मीर : आतापर्यंत 7 दहशतवाद्यांची घरे उध्वस्त

admin
Last updated: 2025/04/26 at 5:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

श्रीनगर, 26 एप्रिल (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 26 हिंदुंच्या टार्गेट किलींगनंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी लश्कर-ए-तैयबाच्या 7 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. पहलगाम हल्ल्यात लश्करचा हात असून दहशतवादी हाफिज सईद या हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

शोपियानमधील छोटीपोरा गावात लष्कर कमांडर शाहिद अहमद कुट्टे यांचे घर जमिनदोस्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुट्टे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांचा तो समन्वयक होता. त्याचवेळी, कुलगामच्या मतलाम भागात सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचे घरही पाडण्यात आले. त्याचप्रमाणे पुलवामा येथील मुर्रन भागात दहशतवादी अहसान उल हकचे घर उडवून देण्यात आले. अहसानने 2018 मध्ये पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते आणि अलीकडेच तो खोऱ्यात पुन्हा दिसला होता.

याशिवाय, जून 2023 पासून सक्रिय असलेला लश्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी अहसान अहमद शेख याचे दुमजली घरही पाडण्यात आले. हरिस अहमद यांचे घरही उडवून देण्यात आले आहे. शेख 2023 पासून दहशतवादात सहभागी आहे. त्याचे पुलवामामधील काचीपोरा येथील घर उडवून देण्यात आले.यापूर्वी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांची घरेही स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली होत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात स्फोटकेही ठेवण्यात आली होती.

यासोबतच अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहे. तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.पहलगाम दहशतवादी घटनेनंतर, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या पॅन्ट उतरवल्या होत्या
Next Article सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?