लंडन, 7 जुलै (हिं.स.)
इंग्लंडविरुद्धच्या
लॉर्ड्स कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार आहे. बर्मिंगहॅममधील
कसोटी विजयानंतर कर्णधार शुभमन गिलने ही माहिती दिली आहे. बुमराह १० जुलैपासून
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं त्यानं
सांगतिलं आहे. सामन्यानंतर गिलला विचारण्यात आले की, बुमराह तिसऱ्या कसोटी
सामन्यात खेळेल का? यावर भारतीय कर्णधाराने उत्तर दिले, हो नक्कीच.
जसप्रीत
बुमराहने या मालिकेपूर्वीच स्पष्ट केलं होतं की, तो या दौऱ्यात फक्त तीन कसोटी
सामने खेळणार आहे. बुमराह लीड्समध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला आणि
त्याने पहिल्या डावातही शानदार कामगिरी केली. त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यातून
विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी आलेल्या आकाश दीपने बर्मिंगहॅममध्ये
शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात सहा बळींसह एकूण १० बळी घेतले.
