Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बापरे! काळ्या बाहुल्या कोण बांधतेय कोणासाठी? काय भानगड? चक्क पालकमंत्री म्हणताहेत…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बापरे! काळ्या बाहुल्या कोण बांधतेय कोणासाठी? काय भानगड? चक्क पालकमंत्री म्हणताहेत…

admin
Last updated: 2025/03/24 at 12:49 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर : अश्लील फोटो अन् तीन कोटी खंडणीच्या गुन्ह्यात तक्रारदार महिलेस अटक या प्रकरणांवरुन राज्यात चर्चेत आलेले ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवार (ता.22) माळशिरस तालुक्यातील पिलीव इथल्या भाजप शाखेच्या उद्घाटनात सोहळ्यात तुफान शाब्दिक फटकेबाजी करत विरोधकांना जणू काही ओपन चॅलेंज देत ठणकावल्याचा मानलं जात आहे. ‘सावज टप्यात आलंय’ असा शब्दप्रयोग त्यांनी केल्याने हा त्यांचा इशारा ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असा समजला जात आहे. विशेषत्वे, गोरेंनी यावेळी काळ्या बाहुल्या अन् पूजा बांधण्याची खिल्ली उडविली.
दरम्यान ‘माझ्या पाठीशी देवाभाऊ असल्यानं माझं कुणीही वाकडं करु शकत नाही,

असं विरोधकांना नामदार गोरेंनी ठणकावत ओपन चॅलेंज दिल्यानं त्यांचे विरोधक सजग झाले असून त्यांची पुढची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे राजकीय जाणकरांनी गोरेंच्या ‘त्या’ आव्हानात्मक वक्तव्यानंतर सांगितले. मंत्रि जयकुमार गोरे आणि विरोधी रामराजे निंबाळकर गट यांच्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून प्रचंड घमासान सुरु आहे. एकमेकांना खपविण्याची एकही संधी सोडली जात नाही. इर्षा, द्वेष आणि मत्सर उभतांमध्ये अक्षरश: उफाळून आल्याचे दिसतंय. एकमेकांना पाण्यात पाहण्याचं, कट्टर राजकीय दुष्मनीचा अंक दोघांमध्ये सुरु आहे. याच टप्यावर महिलेस अश्‍लील फोटो प्रकरण उकरुन काढून मंत्रि गोरेंना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रकार झाला.

मात्र सत्तेत असल्यानं गोरेंनी भयंकर डावाचा तो अमिमन्यू भेदला. याच टप्यावर मंत्री गोरे काय बोलतात, याकडे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागू होतं. माळशिरस तालुक्यातील पिलीव इथल्या कार्यक्रमात त्यांनी सुसाट एक्स्प्रेस सुटली. यावेळी त्यांनी चौकार आणि षटकाराची विरोधकांच्या दिशेने तुफान फटकेबाजी करीत त्यांना जणू काही ओपन चॅलेंज दिले.

नदी किनारी पूजा अन् काळ्या बाहुल्या काय बांधता? गो म्हणाले, माझी एकही निवडणूक अशी गेली नाही, ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-सायंकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा आणि बाहुल्या बांधल्या, तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही’, असे जयकुमार गोरे यांनी ठणकावून सांगितले.

फोटो : रणजितसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते एकाच व्यासपीठावर त्रिदेव,
शेकडो कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं पिलीव इथल्या भाजप शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने मंत्रि जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते हे अकलूजकर मोहिते-पाटील विरोधी त्रिदेव रविवारी एकाच व्यासपीठावर अलिकडच्या काळात पहिल्यांदाच आलेले दिसले. यावेळी तिघांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं घालून घेत या पक्षात प्रवेश केला. यानं मोहिते-पाटील गटात पोकळी निर्माण झाल्याचं मानलं गेलं.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातील नुतनीकृत अणुऊर्जा दालनाचे सोमवारी उद्घाटन
Next Article कोणत्या आमदाराने कोणत्या डॉक्टर आमदाराला दिले इंजेक्शन…? भळाभळा रक्त वाहण्याची पाळी…डाॅक्टर साहेब घायाळ…

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?