———
जयाभाऊंच्या ‘त्या’ शाब्दिक बॉम्बस्फोटाची चर्चा थांबता थांबेना,
नेमकं सावज कोण? हे सोलापूर अन् सातारा जिल्ह्याला कळता कळेना!
: पालकमंत्र्यांच्या रडावर कोण रामराजे की अन्य बडे प्रस्थापित?
: गोरेंच्या वर्मी घावाची जेवढी उत्सुकता तेवढी भितीसुद्धा
: काळ्या बाहुल्या बांधल्याचीसुद्धा तितकीच चर्चा
शिवाजी भोसले
सोलापूर : पिलीव (ता.माळशिरस) इथल्या भाजप शाखा उद्घाटन आणि सत्कार सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शाब्दिक बॉम्बस्फोट करुन ठिकर्या उडविल्या. त्याचे पडसाद मुख्य सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यात उमटले.‘मी कुणाच्या नादाला लागत नाही. पण, सावज टप्प्यात आल्यावर सोडत नाही. आता सावज टप्प्यात आलेले आहे,’ असा सूचक इशाराही दिला होता. हा सूचक इशारा नेमका कोणाला होता? माळशिरमध्ये कार्यक्रम होत असल्याने तो सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामधील बड्या प्रस्थ घराण्यासाठी होता की गोरेंचे सातार्यातील कट्टर राजकीय हाडवैरी दुष्मन रामराजे निंबाळकर यांच्यासाठी होता,याबद्दल अचूक अंदाज लागेना झाला आहे. मात्र, सावज संदर्भात सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सुरु असलेल चर्चा थांबता थांबेना हे वास्तव आहे.
विशेषत्वे, पालकमंत्र्यांच्या रडावर कोण रामराजे की अन्य बडे प्रस्थापित? याचा थांगपत्ता लावणे अवघड झाले असताना सत्ताधारी आणि त्याहून मंत्रि असलेल्या गोरेंचा वर्मी घाव भयावह असू शकतो, याबद्दल जेवढे औत्सुक्य आहे, तेवढीच भयानक भिती त्यांच्या विरोध गटामधील वर्तुळात असल्याचा बोलबाला आहे. पालकमंत्री गोरेंच्या ‘कही पे निगाहे, कही पे निशाना’ सुचक विधानाची कुजबुज सातार्यासह सोलापूर जिल्ह्यात आहे.
ग्रामविकास मंत्री गोरे आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांच्यामधील सापा-मुंगसाचे राजकारण सातारा जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला आहे. विधानसभा निवडणुकीत रामराजेंच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून त्यांनतर श्रीराम सहकारी साखर कारखान्याला स्थगिती दिल्याने फलटणच्या राजकारणात रामराजे गट बॅकफूटवर गेलेला आहे. त्याचा संदर्भ गोरे यांच्या बोलण्याशी काहीजणांकडून लावला जात आहे.
कोणते सावज टप्यात?
मंत्रि गोरेंनी ‘मला संपवायला निघालेले स्वतःच संपले’ असेही वक्तव्य यांनी मध्यंतरी सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले होते, त्यामुळे गोरेंचे नेमके सावज कोण आणि कोणते सावज टप्प्यात आले आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जयाभाऊंचं ‘हेच’ होतं सुचक विधान
‘आत्तापर्यंत मी चार निवडणुका लढवलेल्या आहेत. पण एकही निवडणूक अशी नाही की, माझ्यावर केस झालेली नाही. मी स्वतःहून कुणाच्याही नादाला लागत नाही. पण सावज टप्प्यात आल्यावर सोडतही नाही. आता सावज टप्प्यात आलेले आहे’ असे सूचक विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले होते.
काळ्या बाहुल्यांचा अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून जावई शोध
पिलीवच्या कार्यक्रमात गोरे यांनी जी वक्तव्ये केली. त्या वक्तव्यांच्या सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील जाणकारांकडून केला जात आहे. ‘मी पुढे जाऊ नये, यासाठी नदी किनारी पुजा बांधण्यात आली होती, काळ्या बाहुल्यासुद्धा बांधल्या होत्या’ असं वक्तव्य मंत्रि गोरेंनी केलं होतं. त्यानंतर नेमकी कोणी पुजा बांधली? काळ्या बाहुला कोणाला बांधायला लावल्या? कोणाच्या सांगण्यावरुन त्या बांधल्या गेल्या? त्या बांधण्यानं गोरेंबद्दल काय फरक झाला का? याचा जावई शोधदेखील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून लावला जात आहे.
चौकट
मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटाने
पुन्हा पालकमंत्री जयाभाऊ चर्चेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांना खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण योग्य करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली, 2019 साली ती केस संपली. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या जात आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झाले, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली. त्यानंतर सापळा रचून पैसे देताना आरोपीला पकडण्यात आला. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता, अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सभागृहातील उपस्थित सर्व नेते निरुत्तर असल्याचे पाहायला मिळाले.
सगळेच पुरावे सापडल्याचा दावा…
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला आहे. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण देखील सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत. या सगळ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक संपर्कात असल्याचे दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. तर सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडले आहेत. जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार : सुप्रिया सुळे
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे.
फोटो रोहित पवार
गोरेंवर नवा आरोप मेलेल्या
भिसेंना ’जिवंत’ करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
महिलेच्या आरोपाचे प्रकरण ताजे असतानाच मंत्रि गोरेंवर अजून एक नवीन आरोप झाला आहे. आमदार रोहित पवारांनी हा आरोप केला आहे. रोहित पवार पुढे म्हणाले की, करारनामा 11 डिसेंबर 2020 रोजी केला आहे. 8 ऑक्टोबर 2016 रोजी ते मृत झाले होते. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. यात अनेक वेगळ्या गोष्टी जाणवतात. संजय काटकर यांचा फोटो लावला आणि भिसे आहे, असं दाखवण्यात आलं. भिसे अशिक्षित होते, मात्र त्यांची सही इंग्रजीमध्ये करण्यात आली. भिसे कुटुंबीयांना आता न्याय मिळत नाही. एका दिवसात निकाल खालच्या कोर्टात दिला गेला. मात्र, हायकोर्टात गेल्यानंतर न्यायाधीशांनी खालच्या कोर्टाच्या त्या न्यायाधीशांचे डिमोशन केले. त्यांनी कॉलेजवर देखील कब्जा केला आहे. मविआच्या काळात सामान्य लोकांना मदत व्हावी, यासाठी कोरोना काळात योजना आणल्या होत्या. पहिल्या कोरोनाच्या लाटेत भिसे मरण पावले, त्यांना दुसर्या लाटेत जिवंत करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता रोहित पवारांच्या आरोपानंतर जयकुमार गोरे नेमकं काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.