सोलापूर, 20 मे (हिं.स.)। राज्याचे ग्रामविकास मंत्री, तथा सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बरोबर सोलापुर विकास मंचच्या शिष्टमंडळ बरोबर जिल्हा नियोजन इमारती मधील पालकमंत्री यांच्या कक्ष मध्ये सविस्तर प्रदीर्घ बैठक झाली. वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व मध्य सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे ,माढ्याचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते.
सदर बैठकीत सोलापूर विकास म़ंचचे सदस्य इंजि मिलिंद भोसले, केतन शहा, योगीनजी गुर्जर यांनी तीन विषय बैठकीत प्रखरपणे मांडले.
त्या बैठकीमधील प्रश्न त्यांचे बैठकीत झालेली चर्चा खालीलप्रमाणे …
होटगीरोड येथुन विमानसेवा २६ मे ला सुरू होणार होती ,परंतु अद्यापही याबाबत काहीही हालचाल दिसुन येत नाही. या कारणांमुळे सोलापूर विकास मंच २६ मे रोजी विमानतळास कुलुप लावुन आंदोलन करणार आहोत, अशी शिष्टमंडळाने मागणी केली.
माझे मुख्यमंत्री यांच्या बरोबर या विषयावर चर्चा बोलणे झाले आहे. तसेच जेवढ्या शक्य आहे तेवढे लवकर आपण नागरी विमानसेवा सुरु करीत आहोत. त्याच वेळी त्याच ठिकाणी केतन शहा यांनी FLY 91 चे चेयरमन CEO श्री मनेज चाको यांच्या बरोबर पालकमंत्री यांची फोनवर बोलणे करुन दिले.
ही सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली. चाके यांनी गोवा सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करीत आहोत असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री यांनी मुंबई साठी तातडीने प्रयत्न करावे हे महत्त्वाचे असे सांगितले.
एकंदरीत सविस्तर शिष्टमंडळ बरोबर चर्चा झाली त्यानुसार विमानसेवा सुरू ही २६ मे च्या पुढे थोडे जाईल पण नक्की विमानसेवा सुरू होईल. तसेच २६ मे तारीख कुणी जाहीर केली याबाबत मला माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आपण लोकशाही मार्गाने व बुद्धिजीवी वर्ग आहे आपण कृपया २६ मे ला आंदोलन करू नये यामुळेच आपल्याच जिल्हाचे नाव खराब होते. तसेच आपण कृपया आंदोलन करू नये. आपणही यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहात हे आम्हाला सर्वांना माहिती आहे यासाठी थोडे वाट पहा आपण दोघै मिळुन यातून मार्ग काढु, असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.