छत्रपती संभाजीनगर, 14 सप्टेंबर। जायकवाडी धरण ९९.३४% क्षमतेने भरलेले असून, धरणाच्या सर्व २७ दरवाजे उघडून (४.५ फूट उंची) पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या गोदावरी नदीत १,१३,१८४ क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे नदीला पूर आला आहे. यामुळे गोदावरी नदी काठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, विनाकारण धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.