सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. भालके यांच्या प्रचारार्थ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी सभास्थळी पावसाने हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी भर पावसात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांची सभा पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1381299846875807744?s=20
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचं रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज सभा होत आहेत. आज (11मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1381231140938293252?s=20
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षसुद्धा गेले नसते. मात्र, भर पावसात जयंत पाटील यांनी सभा दणाणून सोडली आहे. त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली. जयंत पाटलांच्या या सभेच्या निमित्ताने पवारांनी साताऱ्यातील सभेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे लोक सांगतायत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1381276684863729665?s=20
जयंत पाटील यांची आजची भर पावसातली सभा पाहून अनेकांना शरद पवारांच्या 2019 मधील साताऱ्यातील सभेची आठवण झाली आहे. भर सभेत पाऊस येणे म्हणजे पवारांच्या साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती असून हा तर शुभसंकेतच आहे, असे अनेकांनी म्हटलंय. तर काहींनी हे तर शरद पवार यांच्या पावलांवर पाऊल ठेवणं असून जलसंपदा मंत्र्याच्या अंगावर पावसाची वृष्टी होतेय असं या सभेचं वर्णन केलंय.
