सोलापूर, 2 ऑगस्ट – आमदार विजयकुमार देशमुख समर्थक सोमनाथ रकबले यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त शेळगी परिसरातील नागरिकांसाठी प्रयागराज, काशी आणि अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेसाठी सुमारे 1,470 नागरिकांसाठी संपूर्ण रेल्वे बुक करण्यात आली होती.
यात्रा शुभारंभाच्या सोहळ्यास आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विशेष निमंत्रण दिले होते. तसेच या कार्यक्रमास माजी आमदार आणि बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे भव्य नियोजन केले होते. पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान कार्यक्रमाला हजेरी लावली. आगमनावेळी विजयकुमार देशमुख यांनी गेटवरच त्यांचे स्वागत केले, तर आत दिलीप मालक उपस्थित होते.