Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘सिद्धेश्वर’ची चिमणी जेसीबीच्या विळख्यात, लवकरच होणार जमीनदोस्त, 135 जणांना नोटीस देऊन सोडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘सिद्धेश्वर’ची चिमणी जेसीबीच्या विळख्यात, लवकरच होणार जमीनदोस्त, 135 जणांना नोटीस देऊन सोडले

Surajya Digital
Last updated: 2023/06/15 at 12:06 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

सोलापूर : विमानसेवेसाठी वादग्रस्त ठरलेले कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ‘चिमणी’ वर हातोडा उगारण्याच्या प्रक्रियेला बुधवारी पहाटेपासून अखेर सुरुवात झाली ही प्रक्रिया सलग चार दिवस चालेल, असे सांगण्यात आले.  Chimney of ‘Siddheshwar’ in JCB’s Vilak, soon to be zamindost, 135 people released with notice Airmenseva Solapur मंगळवारी कारखाना परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करून पोलिसांनी कारखाना परिसराचा ताबा मिळविला. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही, जे तावडीत सापडतील त्यांना उचल की आत घाल’ ही एकमेव भूमिका पोलिसांनी घेतली होती पोलिसांनी इतका लगा बंदोबस्त ठेवला होता की, चिमणीच्या बाजूने भूमिका घेणारे गप्पगुमान झाल्याचे दिसून आले.

 

चिमणी पाडकामासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाने प्रचंड गुप्तता बाळगली होती. कारखाना परिसरात सारा लवाजमा तैनात केल्यानंतर बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून प्रशासनातर्फे चिमणी पाडकाम प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. भल्या पहाटेच सोलापूर महापालिका आणि पोलिसांची यंत्रणा कारखान्यामध्ये चिमणी पाडकामासाठी पुसली. कारच्या परिसरात दीड ते दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. सहाहून अधिक अॅम्बुलन्स कारखाना स्थळावर तैनात केले आहेत. चारही बाजूने सर्व बंद करण्यात आले आहेत. एक किलोमीटर परिसरात सर्व रस्ते सुनसान आहेत.

 

दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, सिमेंट काँक्रीटची असणारी ही चिमणी पाहण्यासाठी विविध टप्यावर बुधवारी दिवसभरात हॉल पहले आहेत, जिलेटिनचा स्फोट पह ही चिमणी पाडली जाणार असू ती होल पाडून दो-या आणि तारा बांधून एका बाजूला ओटून पाडली जाणार आहे. दरम्यान बुधवारी चिमणीच्या परिसरात विखुरलेले बस इलेक्ट्रिक वायरिंग व इतर अडचणीत ठरत असलेला पसारा हटविण्यात आला.

 

सिध्देश्वर कारखाण्याची चिमणी पाडण्याचे आदेश यापूर्वीच राज्य सरकारने दिले होते. पण, कारखान्याने ती प्रक्रिया केली नसल्याने आता प्रशासनातर्फे चिमणी पाडण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रशासक शीतल तेली-उगले यांनी कारखान्याला 11 जूनपर्यंत चिमणी पाडून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कारखान्याने चिमणी पाडली नसल्याने आता स्वतः प्रशासक पाडकाम करण्यासाठी पाउल उचलले आहे.

बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून कारखान्याकडे जाणारे चारही बाजूचे रस्ते पोलिसांनी बंद केले. पहाटेच चिमणीचे काम करण्यासाठी पेक्षा अधिक जेसीबी, तीन मोठे क्रेन कारखाना स्थळावर दाखल झाले होते. तत्पूर्वी कारखान्याच्या शेजारील कामगार वसाहत एक तासात रिकामे करण्याची सूचना पोलिसांनी रहिवाशांना दिली होती. त्यानुसार त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे.

कारखाना आवारातील चिमणी मार्गावर असणाऱ्या ऊस वाहतुकीच्या ट्रॉली, ट्रेलर जेसीबीद्वारे काढण्यात आले. सकाळी दहा वाजता चिमणीच्या खाली मोठ्या प्रमाणात असलेला बगॅस काढण्याचे काम सुरुवातीला हाती घेण्यात आले. पोकलेन आणि क्रेन साह्याने ते काढण्याचे काम दोन तास सुरु होते.

 

त्यानंतर चिमणीची उंची अधिकृतरीत्या मोजण्यात आली. दुपारनंतर चिमणीच्या बाजूने जेसीबी, पोकलेन लावण्यात आले. सायंकाळी सहानंतर जेसीबीच्या सहाय्याने धुराटणीचे पार्ट काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

○ पोलिसांनी १३५ जणांना नोटीस देऊन सोडले

 

कारखान्यात आंदोलन करणाऱ्या जवळपास 135 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तेथून गाडीत बसवून नेले. त्यानंतर सायंकाळी त्या सर्वाना
नोटीस देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

 

○ राज्य राखीव दलाचे दोन तुकड्या तैनात

कारवाईसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यासाठी जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवाय राज्य राखीव दलाच्या सहा ते आठ कंपन्या तैनात केले होते. शिवाय ग्रामीण भागात राज्य राखीव दलाचे दोन कंपन्या बंदोबस्तासाठी लावण्यात आले होते.

○ चिमणीचे कनेक्शनही जेसीबीने कट केले

 

चिमणीच्या दरवाज्याजवळ सकाळी जेसीबी पोहोचला. तिथून चिमणीचं कनेक्शनही तोडण्यात आले. पोलीस यंत्रणेला विरोध करण्यासाठी शेकडो कामगार प्रवेशद्वारासमोर थांबले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना उचलले.

○ कर्मचारी, आंदोलकांना इतरत्र हलवले

 

कारखाना प्रवेशद्वारात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तर काहींना पोलीस वाहनात बसवून बाहेर नेले. काही कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था एसआरपी कॅम्प तर आंदोलकांना शहरातील सेवासदनाशाळेजवळील मंगल कार्यालयात हलवण्यात आले आहे. नेहमी कामगार, ऊस मजूर यांच्या वर्दळीने गजबजणा-या कारखाना परिसरात पोलिस शीघ्र कृतिदल व अजस्त्र यंत्रणांच्या हालचाली सुरु आहेत.

● गेट तोडून पोलीस कारखान्यात घुसले

सकाळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने कारखानास्थळावर पोहोचले, त्यावेळ कारखान्याचे गेट बंद होते. पोलिसांनी कामगारांना गेट उघडायला सांगितले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नाईलाजाने पोलिसांनीच गेट तोडले. कारखान्याच्या मागील बाजूचे गेट जेसीबीने अक्षरश उचकटून रस्ता मोकळा केला. या कामासाठी दोन तास लागले.

● राजकीय नेत्यांचा कारवाईला विरोध

 

चिमणी पाडकाम कारवाईचा शहरातील राजकीय नेत्यांनी विरोध केला. माजी आमदार आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, प्रा. अशोक निंबर्गी, चेतन नरोटे, विजयकुमार हत्तुरे आदींनी ही कारवाई चुकीचे असल्याचे सांगितले. तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कारवाईचा निषेध केला.

● वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून

चिमणी पाडकामावेळी परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातील मातब्बर वरिष्ठ अधिकारी पहाटेपासूनच कारखानास्थळावर तळ ठोकून होते. संपूर्ण दिवसभरात पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, गुन्हे शाखेच्या दिपाली काळे यांच्यासह अनेक पोलिस अधिका-यांनी कारखानास्थळाला भेट दिली.

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Chimney #Siddheshwar #JCB's #Vilak #zamindost #people #released #notice #Airmenseva #Solapur, #सिद्धेश्वर #साखर #कारखाना #रास्तारोको #चिमणीबचाव #कारखानाबचाव #घोषणा #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा लाक्षणिक बंद !
Next Article ब्रेकींग ! अखेर सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त, धर्मराज काडादी हतबल, डोळे पाणावले

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?