नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे JEE (Main) 2021 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा 27, 28, आणि 30 एप्रिल रोजी होणार होत्या. सुधारित तारखा पुढे जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या जवळपास 15 दिवस आधी तारीख घोषित करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383658073844191234?s=19
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अनेक राज्यातील विद्यार्थांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. तर काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातच भर म्हणून राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा (एनटीए) एप्रिलअखेर घेण्यात येणारी जेईई (जॉइंट एंट्रन्स एक्झाम) परिक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383653113446342660?s=19
एनटीएने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना जारी केली आहे. त्याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी सकाळी ट्वीट करून एप्रिल महिन्यातील परीक्षा पुढे ढकलली असल्याचे स्पष्ट केले. परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख किमान १५ दिवस अगोदर जाहीर केली जाणार असल्याचे ‘एनटीएन’ने निवेदनात नमूद केलेले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फेब्रुवारी महिन्यात सहा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी तर मार्च महिन्यात पाच लाख 56 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383665707410345994?s=19
यंदा जेईईची मेन परीक्षा चार सत्रांत घेण्यात येत आहे. पहिले सत्र 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचा निकाल 7 मार्च रोजी लागला. त्याच वेळी, एनटीए सत्र 16, 17 आणि 18 मार्च रोजी आयोजित केली होती. आता 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी होणारी जेईई परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परिक्षा होण्याच्या 15 दिवस आधी नवीन वेळापत्रक जारी करण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383679591978467334?s=19
देशभरात कोरोनाच्या साथीने हाहाकार माजविला असून रोज लाखो रुग्णांची नव्याने भर पडत आहे. यामुळे विविध परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच सीबीएससी बारावीची परीक्षा पुढे ढकलली तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवीची नीट परीक्षाही पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रात इयत्ता दहावी बारावी, एमपीएससी या परीक्षांवर परिणाम झालेला आहे, या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र, जेईई मेन्स एप्रिल याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देखील वितरित करण्याचे काम सुरू झाले होते. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलली आहे.