Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झेलम नदीला पूर, पाकिस्तानी मीडियाचा भारतावर आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

झेलम नदीला पूर, पाकिस्तानी मीडियाचा भारतावर आरोप

admin
Last updated: 2025/04/27 at 5:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लाहोर , 27 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानातील झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुजफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमरजन्सीची घोषणा केली आहे.या घटनेमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. या पुरामुळे स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये आणिबाणी लागू करून लोकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मशिदींमधूनही घोषणा करून लोकांना सूचना दिली जात आहे. या घटनेनंतर, नदी काठी राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. या वृत्तानुसार, हे पाणी भारतातील अनंतनाग आणि पाकिस्तानातील चकोठी भागातून वाहत आहे.

तत्पूर्वी, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यातच भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. दरम्यान, ‘मोदी सरकारकडून सिंधू पाणी करारासंदर्भात घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय, हा पूर्णपणे न्यायसंगत आणि देशाच्या हिताचा आहे. पाकिस्तानात सिंधू नदीचे एक थेंब पाणीही जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,’ असे जल शक्तीमंत्री सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने म्हटले आहे.

You Might Also Like

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू

ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन

भारताने नष्ट केलेल्या दहशदवादी तळांचे पुनर्वसन करू- पाकिस्तान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

यूपीएससीच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा; शिंदे यांचा इशारा
Next Article गुप्तचर विभागाने दिल्लीत राहणाऱ्या ५ हजार पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?