मुंबई : भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी https://appost.in/gdsonline/ वेबसाईटला भेट द्यावी. यासाठी 27 एप्रिल ते 26 मे या दरम्यान अर्ज करता येईल.
कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
कोरोना संकटकाळात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सारीकडेच नकारात्मक वातारण असताना आता अनेक तरूणांसाठी भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केल्याने एक आशेचा किरण आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पत्रकार अविनाश तिपरादी यांचे निधन, सोलापूरच्या माध्यम क्षेत्रात हळहळhttps://t.co/7VneP9ndIK
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
यामध्ये किमान 10 वी पास उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याने तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी दवडू नका. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी कोण, कधी, कसा अर्ज करू शकणार आहे? याची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता. दरम्यान उमेदवाराचं शिक्षण किमान 10 वी असण्यासोबतच त्याला प्रादेशिक भाषेचं ज्ञान आणि सायकल चालवण्याचं ज्ञान आवश्यक आहे.
* अर्ज करण्याची अंतिम तारीख
26 मे 2021
– अर्जाची फी 100 रूपये
– पगार
ब्रांच पोस्ट मास्टर 12000 रुपये,
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार असेल.
पोस्टात नोकरीची संधी, महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी भरती #postoffice #नौकरी #संधी #opportunity #maharashtra #surajyadigital #सर्कल #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/QZHjJDzWwf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
* वयोमर्यादा आणि शुल्क
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS)या पदांवर होणार्या या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे अआवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील.