सोलापूर : सोलापूर दूरदर्शनचे प्रतिनिधी अविनाश सुभाष तिपरादी ( वय ४३,रा. शुक्रवार पेठ) यांचे काविळीवरील उपचार सुरू असताना आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी आणि मोठे बंधू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393893499448172544?s=19
अविनाश तिपरादी यांनी आपली पत्रकारितेची सुरुवात सोलापूर तरुण भारतमधून केली. त्यानंतर ते अनेक वर्षे सोलापूर दिनमान व नंतर सोलापूर वृत्तदर्शन चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर त्यांनी स्टार माझा या चॅनलमध्ये कॅमेरामन म्हणून अनेक वर्षे सेवा बजावली. सध्या अनेक वर्षपासून ते सोलापूर दूरदर्शनचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393924858912796677?s=19
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर सोलापूर रुग्णालयात उपचार सुरू होते. पोटात कावीळ उतरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना बंगळुरू येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार होते. मात्र प्रकृती अधिकच खालावली. अखेर आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393777699773042689?s=19