Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजनवरील कार, गडकरींचा प्रवास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजनवरील कार, गडकरींचा प्रवास

Surajya Digital
Last updated: 2022/03/30 at 4:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली / नागपूर : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीने त्रस्त असलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. देशात आज पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार धावली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या कारमधून प्रवास केला. ते संसदेत आज याच कारमधून पोहोचले. पेट्रोल-डिझेलला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय आहे. याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये आहे.

देशातील पहिल्या हायड्रोजन कारने नितीन गडकरींनी प्रवास केला आहे. ही कार इंधन भरल्यानंतर जवळपास ६०० किलोमीटर अंतर पार करू शकते. या कारचे नाव मिराई आहे. मिराईचा अर्थ भविष्य असा होतो. या कारमुळे प्रदूषण देखील होत नाही. त्यामुळे हा स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या अनेक देशांना हा खूप मोठा दिलासा असणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमधून संसदेत दाखल झाले. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीला ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय असून याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. गडकरी यांनी आज या कारचे प्रात्यक्षिक दिल्लीकरांना करून दाखविले. ना.गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर आधारित इंधनास प्रोत्साहन देण्यासाठी व त्याच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.

Gadkari’s journey on a car running on green hydrogen for the first time

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

नागपुरात १२ ते १४ मार्चदरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. त्याची माहिती देताना ते बोलत होते. ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेकडू शहरात राबवण्यात येणार आहे. कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण केले जाईल. ग्रीन हायड्रोजनचे विदर्भ हे केंद्र असणार आहे.

जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आज त्यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून घरापासून तर संसदेतपर्यंत प्रवास केला. बाजारात तेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन चांगला पर्याय आहे.

 

ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निघणारं हायड्रोजन. त्यावर गाडी सहज चालतेय. याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल. मथुरामध्ये देखील आम्ही सांडपाण्यावर प्रयोग केले आहेत. देशातील महापालिकेत असणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर उपाय शोधून आम्ही स्वच्छ इंधन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण इंधनामध्ये देखील स्वावलंबी व्हायला पाहिजे, असं नितीन गडकरी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.

केंद्र सरकारने ३००० कोटी रुपयांचे मिशन सुरू केले असून देश हायड्रोजन निर्यात करणार देश बनेल. जिथं कोळशाचा वापर होतो तिथं ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर होईल. ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन वापरण्याचं ठरवलं आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होईल. आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी व्यक्त केला.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

TAGGED: #Gadkari's #journey #car #running #green #hydrogen #firsttime, #पहिल्यांदाच #धावली #ग्रीन #हायड्रोजन #कार #गडकरी #प्रवास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला
Next Article महाराष्ट्रात सूर्य तळपला, जळगावात पहिला मृत्यू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?