अहिल्यानगर, 28 एप्रिल (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने वरिष्ठ राजयोग शिक्षिका बी के शीला दीदी व १८३ विश्व विक्रम करणारे १ ले भारतीय बी के डॉक्टर दीपक हरके यांनी भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बाणेर येथे बनविण्यात आलेल्या सर्वात मोठ्या ग्रिटींग कार्डची इंग्लंडच्या ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद झाल्याचे प्रमाणपत्र भेट दिले.
यावेळी डॉक्टर दीपक हरके यांनी केलेल्या या विश्वविक्रमाबद्दल जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी अभिनंदन केले व दिल्ली मध्ये पुन्हा भेटीचे निमंत्रण दिले.या वेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते.