Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: न्यायधीशांची संपत्ती वेबसाईटवर जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

न्यायधीशांची संपत्ती वेबसाईटवर जाहीर

admin
Last updated: 2025/05/06 at 8:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) : सर्वोच्‍च न्‍यायालयाने न्यायाधीशांच्या संपत्ती आणि कर्जाच्या (दायित्वाच्या) घोषणांची माहिती सार्वजनिक केली आहे. ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संपत्तीची घोषणा सार्वजनिक झाली आहे. सरन्यायमूर्ती संजीव खन्ना आणि 20 इतर न्यायाधीशांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामध्‍ये भावी 3 सरन्‍यायमूर्तींचाही समावेश आहे.

दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी रोख रक्कम सापडली. यानंतर सरन्‍यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सर्वोच्‍च न्‍यायालयातील न्‍यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्‍याचा निर्णय घेतला होता.

सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी जनतेच्या माहितीसाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया वेबसाइटवर अपलोड केली आहे. उच्च न्यायालयात 9 नोव्हेंबर 2022 ते 5 मे 2025 या कालावधीत न्यायाधीश म्हणून झालेल्या नियुक्त्यांसाठी सर्वोच्च न्यायालय कोलेजियमने दिलेल्या शिफारशींची माहिती – नाव, उच्च न्यायालय, स्त्रोत (सेवा किंवा बारमधून), कोलेजियमच्या शिफारशीची तारीख, न्याय विभागाची अधिसूचना तारीख, नियुक्तीची तारीख, विशेष प्रवर्ग (SC/ST/OBC/अल्पसंख्यक/महिला), तसेच संबंधित उमेदवार कोणत्याही विद्यमान किंवा सेवानिवृत्त उच्च न्यायालय/सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशाचा नातेवाईक आहे का, याचीही माहिती वेबसाइटवर दिले गेले आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या वेबसाईटवरील माहितीनुसार, तत्‍कालीन सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील कोलेजियमने शिफारस केलेली एकूण 17 नावे अद्याप सरकारकडे प्रलंबित आहेत. तसेच सरन्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कोलेजियमने शिफारस केलेली 12 नावेही प्रलंबित आहेत. अशा प्रकारे, 9 नोव्हेंबर 2022 पासून एकूण 29 न्यायाधीशपदाच्या नियुक्त्या सरकारकडे प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या 3 सदस्यीय समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांबाबतचा अहवाल सरन्‍यायाधीश संजीव खन्ना यांना सादर केला आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जी. एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनु शिवरामन यांच्या समितीने 3 मे रोजी अहवाल अंतिम केला होता. हा अहवाल 4 मे रोजी सरन्‍यायाधीशांकडे सुपूर्त करण्यात आला अहे. अहवालामध्ये 14 मार्च रोजी रात्री 11.35 वाजता न्यायमूर्ती वर्मा यांच्या लुटियन्स दिल्लीतील निवासस्थानी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सापडलेल्या रोख रकमेसंदर्भातील निष्कर्ष दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवेदनात म्हटले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये युद्धसराव मॉकड्रिल
Next Article विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील जनतेकडून चूक – अभिनेत्री राजश्री लांडगे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?