Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जसप्रीत बुमराह अडकला विवाहबंधनात, झाला पुण्याचा जावई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

जसप्रीत बुमराह अडकला विवाहबंधनात, झाला पुण्याचा जावई

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 9:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पणजी : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत लगीनगाठ बांधली. त्याने ट्विटरवरून ही गुडन्यूज दिली. ‘आम्ही नव्या जीवनाची सुरूवात केली आहे. आज आमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे’, असं म्हणत बुमराहने लग्नाचे काही फोटो शेअर केले. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज (15 मार्च) प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात होणार झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

“Love, if it finds you worthy, directs your course.”

Steered by love, we have begun a new journey together. Today is one of the happiest days of our lives and we feel blessed to be able to share the news of our wedding and our joy with you.

Jasprit & Sanjana pic.twitter.com/EQuRUNa0Xc

— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) March 15, 2021

प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराहनं लिहिलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“Love, if it finds you worthy, directs your course.”

Steered by love, we have begun a new journey together. Today is one of the happiest days of our lives and we feel blessed to be able to share the news of our wedding and our joy with you.

Sanjana & Jasprit pic.twitter.com/EhXiBPpvHG

— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 15, 2021

* संजना गणेशनविषयी माहिती

संजना गणेशनपेक्षा बुमराह वयाने लहान आहे. बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 ला तर संजनाचा जन्म पुण्यात जन्म पुण्यात 6 मे 1991 ला झाला. संजनाचे वडील गणेशन रामास्वामी मॅनेजमेंट गुरु आणि एक लेखक आहेत. तसंच आई डॉक्टर सुषमा गणेशन या वकील आणि फिटनेस कोच आहेत. संजनाचं शालेय शिक्षण पुण्यातील बिशप स्कूलमध्ये झालं. त्यानंतर 2008 मध्ये सिम्बॉयसिसमधून तिने बी टेक पूर्ण केलं. सिम्बॉयसिसमध्ये संजनाने सुवर्णपदक पटकाववलं होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आयटी आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी जॉइन केली. 2013 ते 2014 या कालावधीत संजना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.


* अशी आहे बुमराहची लव्हस्टोरी

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आज बोहल्यावर चढला. गोव्यात जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं आहे. संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान झाली. संजना ही कोलकाता नाइट रायडर्स संघाची स्पोर्ट्स अँकर आहे. आयपीएल दरम्यान झालेल्या भेटीत जसप्रीत व संजना चांगले मित्र झाले आणि हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

You Might Also Like

धोनीने मित्रांबरोबर साजरा केला ४४ वा वाढदिवस

विराट कोहलीचा पुतण्या क्रिकेटच्या मैदानात

जसप्रीत बुमराह लॉर्ड्स कसोटी सामन्यात खेळणार – शुभमन गिल

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

TAGGED: #Juspritt #bumrha #sanjana #marraige #Atgoa, #जसप्रीतबुमराह #अडकला #विवाहबंधनात #झाला #पुण्याचा #जावई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरकरिता शनिवारपासून उजनीतून ऊन्हाळी आवर्तन सुटणार
Next Article डिलिव्हरी बॉय प्रकरणात आता ‘त्याच’ मॉडेल तरुणीवर गुन्हा दाखल

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?