Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानातील नवा व्हिडीओ समोर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानातील नवा व्हिडीओ समोर

admin
Last updated: 2025/05/26 at 5:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 26 मे (हिं.स.)। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या तपास संस्थांच्या ताब्यात आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे. एकीकडे तिची चौकशी केली जात असताना आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तब्बल 6 बंदुकधारी लोकांमध्ये पाकिस्तानात खुलेआम फिरताना दिसत आहे. यामुळेच तिला पाकिस्तानमध्ये एवढी ताकद नेमकी कशी मिळाली? असा सवाल केला जातोय.

या नव्या व्हिडीओत ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या लाहोरमधील प्रसिद्ध असलेल्या अनारकली बाजारात फिरताना दिसत आहे. याच वेळी तिच्या आजूबाजूला पाच ते सहा बंदुकधारी दिसत आहेत. ती रस्त्यावर फिरत असताना हे बंदुकधारी तिचे संरक्षण करत आहेत. हाच व्हिडीओ पाहून पाकिस्तानमध्ये तिच्याकडे एवढी ताकद नेमकी कुठून आली, असा सवाल उपस्थित केला जातोय. हा प्रश्न स्कॉटलँडचा यूट्यूबर कॅलम मिल याने उपस्थित केला आहे. मिल हादेखील एक यूट्यूबर असून तो आतपर्यंत पाकिस्तानसह इतर काही देश फिरलेला आहे.

कॅलम मिल याने त्याच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याच व्हिडीओत ज्योती मल्होत्रा आणि तो एकमेकांसमोर आल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्योतीने त्याच्याशी संवाद केल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. ज्योतीने मिल याला तू कुठून आलायस असं विचारलंय. तसेच तू याआधी पाकिस्तानात किती वेळा आलायस, असंही तिने विचारलंय. याला उत्तर म्हणून मिल याने मी चार ते पाच वेळा पाकिस्तामध्ये आलेलो आहे, असं सांगितलं. त्यानंतर मी भारतातून आली आहे. कधी वेळ भेटला तर भारतात ये, असं ज्योतीने मिल याला म्हटल्याचं या व्हिडीओत दिसतंय.

हा संवाद झाल्यानंतर ज्योती मल्होत्रा पुढे निघून गेल्याचं दिसतंय. यावेळी तिच्यासोबत पाच ते सहा शस्त्रधारी असल्याचं दिसतंय. याच वेळी कॅलम याने ज्योती मल्होत्रासोबत एवढे सारे शस्त्रधारी का आहेत? असा प्रश्व विचारला आहे. कॅलम याला ज्योती मल्होत्राला पाहून आश्चर्य वाटलेले आहे. या बंदुकांची गरज काय आहे हे मला समजलेले नाही. तिच्या भोवती एकूण सहा जण बंदुक घेऊन उभे आहेत, असं हा यूट्यूबर म्हणताना दिसतोय.

दरम्यान, ज्याती मल्होत्रा सध्या तपास संस्थांच्या ताब्यात आहे. त्यामुळे भविष्यात तिच्या चौकशीतून नेमके काय-काय खुलासे होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशात कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे
Next Article सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला हेरगिरीप्रकरणी अटक

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?