Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंगना प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानी घेतली दखल; या शिवसेना नेत्याच्या अटकेची केली मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशटॉलीवुड

कंगना प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानी घेतली दखल; या शिवसेना नेत्याच्या अटकेची केली मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/09/04 at 10:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानं वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या ट्विटनंतर शिवसेना आमदारांनी दिलेल्या धमकीची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे.

बॉलीवूडसह मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा कंगनाला यावरून सुनावलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थेट धमकीच दिली असून कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिचे तोंड फोडतील, असं म्हटलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की, खासदार संजय राउत यांनी कंगनाला सौम्य शब्दात सांगितलं पण ती जर इथं आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिला चोख प्रत्युत्तर देतील. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की प्रताप सरनाईक यांनी कंगनाला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करायला हवी आणि मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे असंही त्या म्हणाल्या.

कंगनाने केलेल्या ट्विटमधून तिनं देशाविरोधात असं कोणतं वक्तव्य केल्याचं किंवा कोणाला धमकी दिल्याचं वाटत नाही असं राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटलं आहे. यातून शिवसेना नेत्यांची मानसिकता दिसून येते. जर महिला स्वतंत्रपणे त्यांची मते मांडत असतील तर ते पाहवत नसल्याचंही मत रेखा शर्मा यांनी नोंदवले आहे.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

TAGGED: #कंगनाप्रकरण #शिवसेना #महिलाआयोग #नेत्याची #अटकेची #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण
Next Article कंगना ट्वीट प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली उडी

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?