Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कामतीत उन्हामुळे लागली आग; रोडच्या कडेचे टेम्पो पेटले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कामतीत उन्हामुळे लागली आग; रोडच्या कडेचे टेम्पो पेटले

Surajya Digital
Last updated: 2022/05/07 at 9:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● बार्शीत उसाच्या ट्रॅक्टरने दिली धडक, एक ठार एक जखमी

विरवडे बु  : कामती बु (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी (ता. 6) भर दुपारी दोन वाजता अचानक रस्त्याच्या कडेला वाळलेले गवत पेटले. वाऱ्यामुळे आग भडकली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लागली. बघता बघता आगीने पेट घेतला. बघ्याची गर्दी झाली. The sun set on fire in Kamati; The tempo on the side of the road ignited

ही वाहने कामती पोलिसांनी वाळू वाहतूक करताना कारवाई करून जप्त केलेली आहेत. वर्षानुवर्षे ही वाहने रस्त्याच्या कडेला लावलेली आहेत. त्या वाहनाच्या अवतीभवती सर्व गवत व झुडपे उगवली आहेत. त्यामुळे वाहनांना आग लागून दोन टेम्पो जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

शेजारील खताच्या दुकानातून नळ चालू करून नागरिकांच्या साह्याने पाणी ओतून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाऱ्यामुळे आगीच्या झळा नागरिकांना दूर लोटत होत्या. दरम्यान आग लागलेल्या ठिकाणापासून कामती चौक जवळच आहे. चौकात अनेक मोठमोठी दुकाने आहेत. आग जर पसरत गेली असती तर खूप मोठे नुकसान झाले असते. मोकळ्या परिसरात ही आग नेमकी कशी लागली याचा पोलीस शोध घेत आहेत.

https://www.facebook.com/109399567404448/posts/535935084750892/

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ ऊसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी, अज्ञात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल 

बार्शी  : बार्शी तालुक्यातील हळदुगे येथे शेतात पाणी देण्यास चाललेल्या दोघांना  ऊसाचे ट्रॅक्टरने धडक दिल्याने  एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला असुन याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर  चालकाविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दादासाहेब श्रीमंत नलवडे ( रा. हळदुगे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात  हणुमंत राजाराम काटे (वय ५९ रा. हळदुगे) हे जागीच ठार झाले तर दिनकर तुकाराम मोहिते (वय ५० रा. हळदुर्गे ता. बार्शी ) हे गंभीर जखमी झाले.

हनुमंत काटे व दिनकर मोहिते  रात्री साडेआठ वाजता शेताला पाणी देऊन येतो असे घरी सांगून   गेले. परंतु ते शेतात जाण्याऐवजी मोटारसायकल क्रमांक एम.एच. १३ एन. एच. २११० या वरून  उपळे गावाकडे चालले होते. रस्त्यात मकरंद बाबासाहेब रोटे यांचे शेताचे जवळ समोरून आलेल्या ऊस भरलेल्या  लाल रंगाच्या ट्रॅक्टरने (आर. टी. ओ. क्रमांक माहीत नाही)  त्याच्या मोटरसायकलला  जोराची धडक दिली.

यामध्ये काटे हे जागेवर ठार झाले तर दिनकर मोहिते हे गंभीर जखमी झाले. या अपघातात काटे यांच्या  मृत्यूस  व मोहितेंना गंभीर इजा करण्यास कारणीभूत ठरलेल्या  अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात सदर अपघाताची माहिती न देता, जखमींना वैदकीय मदत न पुरविता पळून गेला म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद्र परजणे हे करत आहेत.

https://www.facebook.com/109399567404448/posts/535873601423707/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #sunset #fire #Kamati #tempo #onside #road #ignited, #कामती #उन्हामुळे #आग #रोडच्या #टेम्पो #पेटले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्याहून आलेल्या विवाहित तरुणाची सोलापुरात गळफास घेऊन आत्महत्या
Next Article Diesel rate and farmer डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना, शेतकरी हवालदिल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?