Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संप, सरकारने दिला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संप, सरकारने दिला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2020/11/26 at 4:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय कामगार संघटनांनी आज गुरुवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. यामध्ये देशभरातील तब्बल 25 कोटी कामगार सहभागी झाला असल्याचा दावा कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचारी व कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी या लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे. केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विविध क्षेत्रांत खासगीकरणाच्या माध्यमातून कामगारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कामगार, कर्मचा-यांच्या देशव्यापी २६ नोव्हेंबर रोजी होणा-या संपात सहभागी होण्यावर राज्यातील कर्मचा-यांच्या प्रमुख संघटना ठाम असून सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे संपात सहभागी झालात तर शिस्तभंगाची कारवाई करु आणि त्या दिवशीचा पगारही मिळणार नाही, असे राज्य सरकारने बजावले आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या नावाखाली 27 विद्यमान कायदे रद्द करण्यात आले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगताच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

नव्या कायद्यानुसार श्रमिकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळणार नाही. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय कामगार संघटनांनी आजचा देशव्यापी बंद पुकारला आहे.

* या संघटनांचा सहभाग

या देशव्यापी बंदमध्ये भारतीय कामगार सेना, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एटक), हिंद मजदूर सभा (एचएमएस), सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (एआययूटीयूसी), ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर (टीयूसीसी), सेल्फ-एम्प्लॉईड वुमेन्स असोसिएशन (सेवा), ऑल इंडिया सेंट्रल काऊन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (एआयसीसीटीयू), लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (एलपीएफ) आणि युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस (यूटीयूसी) या संघटना सहभागी झाले आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #कामगारविरोधी #धोरणांच्या #निषेधार्थ #संप #सरकारनेदिला #शिस्तभंगाच्या #कारवाईचा #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, कोरोना लस येत नाही तोपर्यंत शाळा बंदच राहणार
Next Article प्रचाराला जात असलेल्या ‘वंचित’च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?